साधारण ९ वर्षांनी फिरकले आहे स्वतःच्या ब्लॉग वर. म्हणजे बाकी प्रोफेशनल प्लॅटफॉर्म्स वर लिखाण चालू होते पण मातृभाषेतल्या लिखाणाची मजा वेगळीच.
तर आज घेऊन आले आहे एक रेसिपी -
Verwirrender Kartoffeln ( Translation - confusing potatoes) ☺
कृती वाचताना जिन्नस सहज लक्षात येतील-
1. फरसाणाच्या डब्यातलं उरलेलं फरसाण घ्यावं.
2. घरी केलेल्या कुरमुऱ्यांच्या चिवड्यातलं तळागाळातलं मिश्रण घ्यावं.
3. हे सगळं मिश्रण मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावं (इतकं बारीक वाटावं की ब्रम्हदेवाच्या बाबांनाही त्यातले मूळ घटक ओळखता येऊ नयेत
).
4. वाटण करताना मध्येच फ्रीजमध्ये ठेवलेल्या आळशीच्या (जवसाच्या) कंटाळवाण्या चटणीची आठवण झाली, की तिलाही या वाटणात चोरपावलानी प्रवेश द्यावा.
5. मग या मिश्रणाच्या सगळ्या तीव्र चवी बॅलन्स होण्यासाठी त्यात उकडलेले बटाटे घालावेत.
6. या मिश्रणाची टिक्की करायचा विचार प्रथम करावा.
7. मग गरम तेलात सोडलेली पहिलीच टिक्की गर्भगळीत झाली, तरी आपण धीर न सोडता “आता याची मस्त थालीपीठं करूया” असं म्हणावं.
8. सरतेशेवटी तव्यावर एकसंध लावलेले थालीपीठ अनेक तुकड्यांमध्ये धारातिर्थी पडल्यावर, सरळ तो सगळा गोळा घेऊन कढईत तेलावर मोकळ्या भाजणीसारखा परतवावा.
9. खायला देताना मात्र पांढऱ्याशुभ्र प्लेटमध्ये याला मध्यभागी ठेवून, बाजूला गोडगुलाबी बिटाच्या दह्यातल्या कोशिंबीरीचे कोंदण द्यावे आणि कांदापातीची कोवळी पाने त्यावर पेरावी
10. आणि कहर म्हणजे, घरच्यांनी “हे मस्त लागतंय, अजून आहे का? “ असं विचारल्यावर, “अशी रेसिपी शतकातून एकदाच, आणि थोडीशीच बनते” असे बाणेदार उत्तर द्यावे

1. फरसाणाच्या डब्यातलं उरलेलं फरसाण घ्यावं.
2. घरी केलेल्या कुरमुऱ्यांच्या चिवड्यातलं तळागाळातलं मिश्रण घ्यावं.
3. हे सगळं मिश्रण मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावं (इतकं बारीक वाटावं की ब्रम्हदेवाच्या बाबांनाही त्यातले मूळ घटक ओळखता येऊ नयेत
).4. वाटण करताना मध्येच फ्रीजमध्ये ठेवलेल्या आळशीच्या (जवसाच्या) कंटाळवाण्या चटणीची आठवण झाली, की तिलाही या वाटणात चोरपावलानी प्रवेश द्यावा.
5. मग या मिश्रणाच्या सगळ्या तीव्र चवी बॅलन्स होण्यासाठी त्यात उकडलेले बटाटे घालावेत.
6. या मिश्रणाची टिक्की करायचा विचार प्रथम करावा.
7. मग गरम तेलात सोडलेली पहिलीच टिक्की गर्भगळीत झाली, तरी आपण धीर न सोडता “आता याची मस्त थालीपीठं करूया” असं म्हणावं.
8. सरतेशेवटी तव्यावर एकसंध लावलेले थालीपीठ अनेक तुकड्यांमध्ये धारातिर्थी पडल्यावर, सरळ तो सगळा गोळा घेऊन कढईत तेलावर मोकळ्या भाजणीसारखा परतवावा.
9. खायला देताना मात्र पांढऱ्याशुभ्र प्लेटमध्ये याला मध्यभागी ठेवून, बाजूला गोडगुलाबी बिटाच्या दह्यातल्या कोशिंबीरीचे कोंदण द्यावे आणि कांदापातीची कोवळी पाने त्यावर पेरावी

10. आणि कहर म्हणजे, घरच्यांनी “हे मस्त लागतंय, अजून आहे का? “ असं विचारल्यावर, “अशी रेसिपी शतकातून एकदाच, आणि थोडीशीच बनते” असे बाणेदार उत्तर द्यावे

No comments:
Post a Comment