Thursday, February 2, 2012

मेथी-केळ्याचे शाही पराठे

आज मी आपल्याला आमच्या घरातील सर्वांची आवडती पाककृती सांगणार आहे. हे करताना थोडीशी मेहनत लागते खरी, पण माझ्या मते - its worth it. 


जिन्नस
मेथी २ जुड्या, ४ पिकलेली केळी, ओवा १ चमचा, तीळ २ चमचे, साखर २ चमचे, लाल तिखट १ लहान चमचा,
चिमुटभर हिंग, चिमुटभर हळद, बेसन २ चमचे, रवा २ चमचे, तांदुळाचे पीठ १ चमचा, दही १ चमचा,मीठ चवीनुसार, दोन मोठे चमचे तेल, मिश्रणात मावेल तितकी कणीक

मार्गदर्शन
१) प्रथम मेथी धुवून बारीक चिरून घयावी.
२) पिकलेल्या केळ्यांची साले काढून आतल्या गराचे बारीक तुकडे करून घ्यावे.
३) कढईत तेल तापल्यावर त्यात केळ्याचे तुकडे टाकून थोडेसे परतून घ्यावे. नंतर त्यातच ओवा, तीळ,साखर,लाल तिखट,हिंग ,हळद,मीठ टाकून परतून घ्यावे.
४) या मिश्रणात चिरलेली मेथी टाकून सर्व मिश्रणाला एक वाफ आणावी.
५) हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात रवा, बेसन, तांदुळाचे पीठ, दही, टाकून व शेवटी त्यात मावेल तितकीच किणक टाकून एकजीव करून घ्यावे. (मिश्रणात पाणी घालू नये. )
६) तयार मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत.
७) या गोळ्यांचे फुलक्यांच्या आकाराचे पराठे लाटून घ्यावेत व म्ध्यम आचेवर दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यावेत. (भाजताना वाटल्यास थोडे तेल सोडावे. )
 ८) गरम गरम पराठे आपल्या आवडीच्या कुठल्याही चटणीसोबत सर्व्ह करावे.


टीपा
१) हे पराठे नुसतेच खायलाही छान लागतात.
२) केळ्यामुळे पराठे खुसखुशीत होतात व मेथीचा कडूपणाही कमी होतो.
३) यामध्ये सर्व प्रकारची पीठे, पालेभाजी, तीळासारख्या तेलबीया, व केळी असल्यामुळे  हे पूर्णान्न आहे.

ही पाककृती काही महिन्यांपूर्वी मी मनोगतावर जेंव्हा regular लिखाण करत होते त्यावेळी टाकली होती. आज वाटले कि हे लिखाण या ब्लॉगच्या वाचकांबरोबर शेअर करावे. म्हणून हा खटाटोप.हे पराठे केले तेंव्हा मस्तपैकी भाजी, कोशिंबीर, मिश्र -भात असा मेनू होता. :)


पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...