Friday, October 22, 2010

चांदणे शिंपीत जा.. अर्थात कोजागिरी पौर्णीमा!

तसे सौंदर्य हे पाहण्याच्या नजरेवर ठरत असले तरीही जगात सर्वाना सारख्याच प्रमाणात आनंद 
देणार्या ज्या काही मोजक्याच गोष्टी आहेत त्यात पूर्णचंद्राचा नंबर बराच वरचा लागतो.
 आणि त्यात आज तर काय, शारदीय पौर्णीमा किन्वा नवान्न पौर्णीमा.
मनाला उत्साह नाही वाटला तरच नवल !
तो नुकत्याच कापलेल्या पिकांचा मंद वास, ती हवेत येउ घातलेली थंडीची हवीहवीशी 
वाटणारी शिरशिरी, ४-५ दिवसांपूर्वी होउन गेलेल्या दसर्यामुळे उत्साही झालेले 
वातावरण आणि या माहौलात ती आकाशातील चांदोमामांची दिमाखदार एंट्री ! 

त्या तेजोमय आनंदास ,खास आटीव मसाल्याच्या दुधाचा नैवेद्य दाखवायचा, त्याचे 
गोजिरे प्रतिबिंब डोळाभर पाहायचे आणि प्रियजनान्सोवत गप्पागोष्टी करण्यात, 
'को जागरति? ' असा प्रश्न विचारणार्या देवीचे स्वागत करण्यात पूर्ण रात्र जागवायची. 
कोणी म्हणेल की आजकाल इतके सोपस्कार करायला वेळ कुठून आणायचा? पण खरच
 अशक्य आहे का हे? थोडे ठरवून तर पाहा, या चांदण्यात चिंब होउन तर पाहा, 
प्रियजनांबरोवर सगळे रुसवे-फुगवे विसरून थोडीशी मौजमजा करून पाहा,
 आयुष्य अचानक सुंदर वाटायला लागेल. 
' The best things in life are free' - हे अगदी पटेल.
 जगणे refresh करण्यासाठी कोजागिरी  पौर्णिमेसारखा दुसरा दिवस नाही असे मला वाटते. 
हा चंद्रमा तुम्हाला आवडेल तेथून पाहा- एखाद्या निवान्त समुद्रकिनारी, गड-किल्ल्यांच्या सहवासात , 
एखाद्या सुंदर फुलानी डवरलेल्या बागेत बसून , दूर माळरानात -आणि यापैकी काहीच जमले नाही
 तर किमान घरातील गच्चीवरून तरी- पण ह्या अमृतधारा अंगावर घ्याच. हे क्षण तुम्ही
 हृदयाच्या कुपीत नक्की जपून ठेवाल, मला खात्री आहे. 
तेंव्हा तुम्हाला कोजागिरीच्या मनापासून शुभेच्छा! ते वर ग्लासेस दिसत आहेत ना , ते उचला आणि म्हणा ' CHEERS !!' 

Sunday, October 17, 2010

आपटयाची पाने....वाचकहो,  

आज विजयादशमी. जे जे वाईट, ते ते सर्व नष्ट, पराभूत होऊन फक्त चांगल्याचाच विजय होतो 
हे सत्य अधोरेखित करणारा हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक मंगलमय दिवस.. 
तेन्व्हा सर्वप्रथम तुम्हा सर्वाना दसर्याच्या मनापासून शुभेछा!
खरतर कुठलाही सण हा कामात अडकलेल्या, जगरहाटीला कंटाळलेल्या, उदास मनान्साठी जगण्याचे नवे 
कारण घेऊन येणारा  एक प्रकाशदूत असतो. नवे संकल्प नव्या उत्साहाने करण्यासाठी, घराप्रमाणेच मनावरही 
चढलेली मरगळ झटकून सर्वकाही नव्याने सुरू करण्यासाठी, निसर्गाने दिलेली आणखी एक संधी असते. 
तरीही आज यापैकी काहीच का करावेसे वाटत नाही? सणाचा आनंद कोणाशीच वाटून घ्यावासा का वाटत नाही? 
मुळात, निसर्गाच्या या रंगपंचमीतला निरागस आनंद लुटायची माझीच इच्छा कमी झालेय का? 
प्रियजनाना केले जाणारे फोन्स हे 'formal sms' मध्ये रुपांतरीत का झालेत ? या सगळ्यातला मायेचा ओलावा कुठे हरवला? 
या सगळ्या गोष्टींचा विचार करत बसलेली असताना मला आजूबाजूला दिसतायत ते
 नालासोपारा येथील असे मामी-मामा ज्यानी स्वार्थासाठी आपल्या चिमण्या भाचरांचा बळी घेतला, 
असे सुस्न्स्कृत(? ) पालक ज्यांच्यातील मतभेदामुळे त्यांच्या बाळाना घरापेक्षा पाळणाघर
 अधिक मायेचे वाटू लागले आहे, आणि अशी मुले ज्याना आपल्या जन्मदात्याना देण्यासाठी
 थोडासाही वेळ नाही वा तसे करण्याची इच्छाही नाही.सन्शय,राग, द्वेष, तिरस्कार, हुकुमत या 
आणि अशाच भावना जगावर राज्य करतायत जश्या काही. 
प्रत्येक गोष्टच ओरबाडून, चढ्या किमतीने घेण्याच्या या रेसमधून आपट्याची कोवळी पानेही सुटली नाहीत 
की वडाच्या फांद्या.. असे मारून मुटकून पुण्य मिळवून काय साध्य करू पाहातोय आपण? 
हा सर्व भपका, ही महागातल्या महाग साड्यांची सळसळ, हा दागिन्यांचा डामडौल, 
ती आजूबाजूची गरीबी, असाहायता, कष्ट नजरेआड करणारी मग्रुरी, या सर्वान्मध्ये
 सण साजरा करण्यातले पावित्र्य, मांगल्य कुठे आहे? 
 कुणाला कदाचित हे चित्र खुपच विदारक वाटू शकेल. पण कुणी सांगेल का की या वातावरणात 
मनातील विशवास, आशेची ज्योत कशी जागृत ठेवायची? Friday, October 8, 2010

तुम्ही घर घेताय का घर?

आपल्यापैकी प्रत्येकानेच हे स्वप्न उरी जपलेले असते. कुणाला समुद्रकिनारी बंगला हवा असतो तर काहींना डोंगराच्या कुशीत लपलेले छोटेसे घरकुल. कोणाला 3 BBK penthouse हवे असते तर  कोणी आयुष्यभराची कमाई साठवून गावाकडे घर बांधायचे स्वप्न पाहात असतो. इच्छा  काहीही असोत, पण काही गोष्टींचा विचार मात्र सर्वांनीच करायला हवा. घर घेण्यापूर्वी काही प्रश्नांची उत्तरे शोधणे अगदी गरजेचे आहे. असेच काही प्रश्न मी खाली देत आहे. आमच्या अनुभवाचा काही जणांना जरी उपयोग झाला तरी  आम्हाला आनंदच होईल. खालील सल्ले हे प्रामुख्याने मध्यमवर्गासाठी व ज्याना आपली कमाई हुशारीने वापरून थोडातरी मनस्ताप  टाळायचा आहे, अशांसाठी आहेत.
 १) सर्वात पहिला मुद्दा येतो तो अर्थातच budget चा. त्यासाठी thumb-rule असा की, जेवढे तुमचे बजेट असेल त्यापेक्षा किमान ४  ते ५ लाख रुपये कमी किमतीचे घर शोधायला हवे. कारण वरचे पैसे हे stamp-duty, registration, society-ट्रान्सफर, मध्ये broker  असेल तर त्याचे brokerage, वकील असल्यास त्यांची फी, या सर्वांसाठी उपयोगी पडतील. इथे मी आमच्या अनुभवांवरून सांगू शकते की जर आपण सर्वद्य आहोत अशी आपली समजूत(खरेतर गैरसमज) नसेल तर आपण वकील जरुर appoint करा. कारण प्रत्यक्ष deal सुरु असताना अनंत अडचणी येतात व प्रत्येक गोष्टीची कायदेशीर बाजू आयत्यावेळी पडताळून पाहाणे दरवेळी जमेलच असे नाही. याउलट विश्वासू वकील आपले हे काम अगदी सोपे करून टाकतो.
२) दुसरे म्हणजे ते घर आपल्याला कोणत्या कारणासाठी हवे आहे याचा विचार करा. ती फक्त investment आहे की आपण तिथे राहणार आहोत? याचे उत्तर शोधा. कारण ती जर investment असेल तर ५ किंवा १० वर्षानी त्याची resale value किती असेल याचा अंदाज़ घ्यायला हवा. पण जर आपण तिथे राहणार असू तर काही वेगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळवावी लागतील. जसे की तिथपर्यंत पोहोचण्यासाठी approach road चांगला आहे ना, जसे की चारचाकी साठी रस्ता वगैरे. आजुबाजुला वस्ती कशी आहे? आपल्या गरजेच्या सर्व गोष्टी जवळच उपलब्ध आहेत का? जर आपल्या घरात लहान मुले असतील तर त्यांच्यासाठी शाळा-कॉलेजेसचे  अंतर किती आहे? दवाखाना, भाजिमार्केट, वाणी, आणि आजकाल अगदी beauty-parlor, laundry, medical store, dvd/vcd retal, cyber cafe या गोष्टी सुद्धा किती अंतरावर आहेत वगैरे... या list मध्ये आपल्या गरजेनुसार फेरफार होऊ शकेल. पण महत्वाचे म्हणजे अशी यादी जर आधीच तयार असेल तर आपले जागा शोधणे थोडेसे सोपे नक्कीच होइल. पब्लिक ट्रांसपोर्ट जसे की  बस, ऑटो, taxi आदींची सोय आहे का हे पाहणेही गरजेचे आहे.  
३) वरील सर्व झाल्या घराबाहेरील गोष्टी. पण प्रत्यक्ष घराचा विचार करताना खालील बाबींचा विचार आधीच करून ठेवल्यास पुढचे सगळे त्रास व त्यायोगे होणारे नुकसान वाचेल.
         घराचा built-up area व carpet area यामध्ये किती तफावत आहे? थोड्याश्या जुन्या society मध्ये हे अंतर  जवळपास २०% असते. तर नवीन बांधकामात built-up एरिया calculate करताना त्यामध्ये घराबाहेरील जागा जसे की corridor, stair-cases, car-parking वगैरे यांचाही समावेश होतो. म्हणून नवीन society मध्ये जरी 1200 sq.feet. built-up (actually super built-up) असे कागदोपत्री म्हटले असेल तरी त्याची carpet value ही typically 750 -850 sq. feet मिळते हे लक्षात घ्यायला हवे. यात जागेचा lay-out महत्वाची भूमिका बजावतो. तो बारकाईने बघून घ्यायला हवा. काही गोष्टी, जसे की kitchen चा lay-out, modular kitchen करण्याची सोय आहे का? dining टेबलासाठी जागा आहे का? भांडी व कपडे धुण्यासाठी स्वतन्त्र dry-balcony आहे का ज्यायोगे कामवाल्या बाईचा kitchen अथवा bathrooms मधील वावर कमी होईल. कपडे वाळत घालण्यासाठी  स्वतन्त्र टेरेस आहे का? बेडरूम्स मध्ये आवश्यक furniture जसे की master-bed, dressing table, side table, 4-door wardrobe (typically for a couple and their small child) ठेवायला पुरेशी जागा आहे ना? एकंदरीत पूर्ण घराचाच lay-out  हा राहणार्या माणसानसाठी सोयीचा  आहे na? वगैरे. खासकरून kitchen, जो पूर्ण घराचा आत्मा आहे, त्यासाठी तर काही गोष्टी आवर्जून बघायलाच हव्यात- जसे की जर modular-kitchen करून घेतले तर मोठी भांडी, काचेच्या वास्तु, वेगवेवळ्या आकाराचे चमचे, वाट्या-भांडी, ताटे, पातेली, आपल्या रोजच्या वापरातील गोष्टी जसे की kitchen-towels,  वाणसामान तसेच दुधाचा हिशोब असलेल्या diaries, tissue papers व वेगवेवळ्या साइज़ मधील plastic-bags (e.g.dustbin bags, zip-lock bags) , gas lighter, screw-drivers, कात्री वगैरे ठेवायला पुरेशी जागा आहे ना? रोजची उपकरणे जसे की fridge, micro-wave, food-processor/mixture,  वगैरेंसाठी पुरेसे electric-points आहेत ना? washing-machine ठेवायला जागा आहे का? वगैरे. या सर्व गोष्टी वरवर पाहता खूप trivial वाटतात पण त्यांच्यावाचुन होणारी गैरसोय ही खूप मोठी असते. म्हणून त्याची वेळीच काळजी घेतलेली बरी !
४) आता थोडेसे व्यवहारासम्बन्धी.. घर घेताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तया घराची कागदपत्रे. एकवेळ ले-आउट वगैरे बद्दल थोडासा compromise  करावा  लागला तरी चालेल पण documents संबंधात रिस्क नकोच. घरासम्बंधातील महत्त्वाची कागदपत्रे, जसे की sale-deed, title-search report, conveyance deed of the society with the builder(if the society is formed), sanctioned-plan वगैरे नीट पडताळूनच घ्यायला हवीत. अर्थात documents आणि bank-loan घेत असल्यास त्याविषयीची काळजी हा स्वतन्त्र लेखाचा विषय आहे. त्याविषयी पुढच्या भागत..
तेन्व्हा थोडक्यात काय तर घर घेताना, घराच्या आतील गोष्टींसाठी 'Place for Everything and Everything in Place' हे सूत्र वापरले तर तिथे राहाणे हा नक्कीच एक सुखद अनुभव असेल...!!

Wednesday, October 6, 2010

welcome to 'Marathi Sumane...

मराठी वाचनाची आवड असलेल्या आणि काहीतरी नव्या, पण साध्यासुध्या लिखाणाच्या शोधात महाजालावर चक्कर मारत असताना इथपर्यंत पोचलेल्या सर्वाना माझा  नमस्कार ...

मी एक साधीसुधी नोकरी करणारी व थोडीफार 'लेखकुगिरी' करण्याची आवड असलेली व्यक्ति.. ही हौस भागवण्यासाठी 'मनोगत' सारख्या ब्लॉग वर लिखाण केले. पण नंतर वाटले की आपणच ब्लॉग का सुरु करू नये? म्हणून हा ब्लॉग... 'मराठी सुमने'... अशा  सर्वांसाठी ज्यांचे रोजच्या जगण्यावर मनापासून प्रेम आहे... त्यातून गवसलेल्या निरागस अनुभवाना share करण्यातली गम्मत माहीत आहे...


पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत !!


माझा काही दिवसांपूर्वी 'मनोगत' वर प्रकाशित झालेला एक लेख इथे जोडत आहे..


--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मी अशा काही सुखी जीवांपैकी एक ज्याना खेड्यातले आयुष्य खूप काळ उपभोगता आले. माझे माहेरचे घर "खेड्यामधले घर कौलारु" या गाण्यामधून उचलून आणलेले... लांबरुंद, ऐसपैस तरीही थोड्याश्या अंधारलेल्या ओटी, पडवी, माजघर अश्या खोल्या, पण आतील माणसांची मने मात्र कायमच सूर्यप्रकाशासारखी उल्हसीत, आणि टवटवीत ! साहिजकच आमच्या घरात कायम सर्वांचा राबता असयचा. हे सर्व म्हणजे माणसांबरोबरच मांजरे,कुत्रा, कावळे, आणि अगदी खारुताई सुद्धा! माझी आईपण  'अतिथि देवो भव'  या उक्तीला जागून दारावर आलेल्या गारुड्यालाही उपाशीपोटी परत पाठवायची नाही.
अशीच एक दिवस एक भाटी (मांजरी) आमच्याकडे आली. बहुतेक ती तिच्या येणारया  बाळान्साठी सुरक्षीत ठाविठकाणा शोधत असावी. ही बया पाहुणी म्हणून आली 
आणि  घरचीच होऊन गेली. काही दिवसानंतर एक दिवस कोठीच्या खोलीतून दोन गोड आवाज आमच्या माऊच्या पुनर्जन्माची चाहूल घेऊन आले. माझ्या आईची बाळबाळंतीणीचे कोडकौतुक करण्यासाठी लगबग सुरू झाली. आमच्या माऊला दोन गोंडस मुलगे झाले होते. आम्ही त्यांची नावे ठेवली जॉन आणि जेम्स !
तसे पाहता कुठलेही पिल्लू  हे सुंदरच दिसते  पण त्यातही मांजराची पिल्ले म्हणजे खासच.. दोघांपैकी जेम्स जास्त गोरा तर जॉन सम्पूर्ण उदी रंगाचा! त्याच्या कपाळावर रुपायाच्या आकाराचा डार्क  उदी रंगाचा ठिपका  एकदम खुलून दिसायचा. या दोघांच्या खोड्या बघताना वेळ कसा जायचा हेच कळायचे नाही.. थोडा मोठा झाल्यावर जेम्स त्याचे नशीब आजमावायला घराबाहेर पडला आणि जॉन मात्र आमच्याजवळच राहिला .. जॉन घरातलाच एक जसा काही.. मांजराना थोडेसे लांबच ठेवणार्या माझ्या बाबानाही त्याचा इतका लळा लागला की आता देवपूजेनंतरचे नैवेद्याचे दूधही आम्हाला  िमळेनासे झाले. आणि जॉनही ते  दूध् िमळवण्यासाठी बाबांची बराच वेळ चाललेली पूजा अगदी मन लावून बघू लागला..

त्याची ती पायात घोटाळण्याची तर्हा इतकी लडीवाळ असायची की आम्हाला त्याचा कधीच कंटाळा आला नाही. त्र जॉनची सोबत आम्हाला आपली, हक्काची वाटायची. खूप वेळ अभ्यास करून िशणवटा आला की जॉनचा रेशमी स्पर्श अगदी हवाहवासा वाटे.  आपल्या पाठीवरच्या छोट्या भावंडांचे लाड करणारा जोनसारखा शान्त, समजुतदार बोका माझ्यातरी पाह्ण्यात नाही.
२००० सालची गोष्ट. आम्ही आमचे घर बांधायला घेतले होते. त्यावेळी आमचा वावर जास्ती करून बेड्यात (बेडे - गाइगुराना ठेवण्याची जागा)असायचा. बेडे साफ करून आई तिथेच स्वयंपाक करायची. ते दोन महीने मोठे कठीण होते. या सर्व दिवसांचा जॉन आमच्याबरोबरीने साक्शीदार होता. एक दिवस  आई बेड्यात जात असताना जॉन तिला सारखा अडवत होता. थोडेसे वैतागून , जॉनला बाजूला सारून ती आत गेली आणि तिथे  बघते तर एक साप नुकताच मरून पडला होता..! त्या दिवसापासून आमच्या मनात जॉनबद्दल प्रेमाबरोबरच कृतज्ञतेची भावनापण निर्माण झाली.
पुढे मी उच्च िशक्शणासाठी मुंबईला आले तरी माझ्या आठवणीन्वर घरच्यान्बरोबर जॉनचाही तेवढाच हक्क होता. त्यावर्षीच जेव्हा मी नाताळच्या सुट्टीत घरी आले तेव्हा जॉनलाही खूप आनंद झालेला िदसला. त्याच्याबरोबर मनसोक्त खेळले. त्यानंतर तो रात्री कुठेतरी गेला.
दुसर्या िदवशी सकाळी 'जॉन अजून कसा घरी आला नाही ' म्हणत आईने जेंव्हा स्वयंपाकघराचे दार उघडले तेव्हा ितला तेथे जॉनचे नीष्प्राण शरीर पडलेले िदसले... बहुदा उंदीर मारण्यासाठी घातलेले औषध त्याच्या पोटात गेले असावे.. पहिल्यांदाच  मी बाबाना इतके हमसून हमसून रडताना पाहिले ..... नंतर जॉनला जेथे पुरले तेथे आम्ही एक फुलझाड लावले. जॉनच्या सुगंधी स्म्रुती जपण्यासाठी...!
मांजर हा विषय  त्यानंतर माझ्यातरी आयुष्यातून कायमचा बाद झाला...!!----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

- टीप - फोंट मधील चुकांसाठी आधीच माफी मागते. ..

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...