Friday, January 20, 2017

YouTube Special: Saturday Night Live

नमस्कार,

गेले अनेक महिने जगभर चर्चिल्या गेलेल्या अमेरिकन निवडणुकीचे आज सूप वाजेल जेंव्हा डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील. अर्थात आजचा लेख ट्रम्प महाशयांवर नाहीये हं (आपण पामर काय बोलणार anyways अशा 'एकमेवाद्वितीय' व्यक्तिमत्त्वाबद्दल. असो).

तर निवडणुकीसंदर्भात चालू असलेले Presidential Debates तीन चार महिन्यांपूर्वी YouTube वर बघत होते. तेंव्हा या विनोदाच्या खाणीचा शोध लागला. आणि मग actual debates ऐवजी या spoofs च्याच प्रेमात पडले. Alec Baldwin  आणि Kate Mckinnon यांनी कसली धमाल उडवून दिली आहे. काही म्हणजे काही भीडभाड नं बाळगता. मला या लोकांचा एक गुण खास करून आवडतो बुवा. एकदा एखाद्याची आरती उतरवायची म्हटली की त्यांना काही म्हणता काही वर्ज्य नाही. अतिशय शार्प intellect आणि त्याला झालर मला अतिशय आवडणाऱ्या sarcasm ची. मिळून सादर होतो तो टोटल मॅडनेस. अर्थात अमेरिकन टीव्ही नित्यनेमाने बघणाऱ्यांना अर्थातच हे नवीन नाहीये. चांगला १९७५ पासून हा शो प्रसारित होतोय आणि वर्षांगणिक अधिकाधिक प्रसिद्धही. खास करून Kate Mckinnonच्या अभिनयाने मी तर सॉलिड इम्प्रेस झालेय. (बऱ्याच वेळेला अतिरंजित असते ते impersonation , पण तरीही there is really something about it, that you burst into laughing. May be that the timing is perfect !!). खाली दिलेल्या लिंक्स नक्की व्हिजिट करा. धमाल आहेत.No comments:

Post a Comment

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...