चला ,ह्या संक्रांतीच्या निमित्ताने आपल्या घराप्रमाणेच आपली मनेही साफ़ करुया.
एकमेकाना माफ़ करुया. ! प्रतिद्या करुया की आपण सारे -
नव्या ओळखी करून घेऊ . जुने सम्बन्ध वृद्धिंगत करु. नातेवाइकान्बरोबरच आपण ज्यांच्यावर खरया अर्थाने अवलंबून असतो तया मोलकरीण, ड्राइवर अशा लोकानाही स्नेहाचे वाण देऊ. त्यांच्या कष्टाचा सन्मान करू. आजारी लोकांची प्रेमाने (किमान फोनवरून तरी ) विचारपूस करू. आपल्या लहानग्याना जवळ बसवून मायेने त्यांचे लाड करू. त्याना ढीगभर खेळण्यांबरोबरच आपला थोडासा वेळही देऊ. सर्वानी मिळून तोंड गोड करू. आणि आपले आयुष्य, जगणे सुन्दर करू...
तुम्हा सर्वाना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
तीळगूळ घ्या गोड गोड बोला..
No comments:
Post a Comment