देश वा धर्म कोणताही असो, जगातील सगळ्या तरुण मातांसाठी सर्वात महत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे "काय केले कि माझे बाळ छान खाईल व त्याला आवश्यक ती पोषणमूल्येही मिळतील. या एकाच प्रश्नामध्ये जगातील अनेक उत्तमोत्तम पाककृतींचा उगम दडला आहे. आजची रेसिपी तशीच काहीशी.. सोपी, तरीही लहान मुलांना आवडणारी..वाढत्या वयातील मुलांसाठी आवश्यक घटकांपैकी काही घटक, जसे की आयर्न, कॅल्शिअम पुरेपूर असणारी, साखरेचा वापर न करताही चवीला गोड आणि पौष्टिक.
रेसीपीचे घटक अगदी सोपे - दाण्याचे कूट, हवा तेवढा खजूर (पाण्यात भिजत टाकून साले काढून घेतलेला - खजुराऐवजी खारकेची पावडर वापरली तरी चालेल), काळ्या मनुका (मिक्सर मधून भरडून घेतलेल्या), बदामाची पावडर, थोडी खसखशीची पावडर, आणि साजूक तूप
कृती - साजूक तुपावर वरील सर्व घटक परतून घ्यावे व हे मिश्रण गार झाले कि त्याचे लाडू वळावे..
आहे कि नाही सोपी! मी तर याला power tablet असेच म्हणते. लहान मुले, आणि हो , स्त्रियासुद्धा (कारण त्यांच्यामध्येही आयर्नची कमतरता असतेच) यांना रोज एक लाडू खायला द्यावा. आताचा मोसम तर असे लाडू खाऊन उत्तम आरोग्याची बेगमी करण्यासाठी फारच चांगला आहे.
मग वाट कसली पाहताय, उचला एकेक लाडू आणि करा थंडीचा सामना... :)
No comments:
Post a Comment