गेले अनेक दिवस प्रचंड धावपळीत घालवल्यावर अचानक जाणवले की अरे, आपण एक ब्लॉग लिहितो जो गेले सहा महिने अगदी दुर्लक्षित आहे. :( आणि त्याच्यावर काहीतरी छानसे सुरु करून आपण तसेच सोडून दिले आहे. तेंव्हा सर्वप्रथम माझे चिमूटभर वाचक मला माफ करतील अशी अपेक्षा करते.
आज मी ज्या सिनेमाबद्दल लिहिणार आहे तो आहे A Touch of Spice हा ग्रीक सिनेमा. २०१२ च्या एप्रिल महिन्यात पुण्यातील NFAI, FTII, आणि BCL यांच्या संयुक्त प्रयत्नाने भरविल्या गेलेल्या Europian Film Festival मध्ये हा सिनेमा दाखवण्यात आला होता.
आता ग्रीस म्हटले की लगेच आपल्याला Aristotle, Pythagoras, Archimedes, Plato अशा अनेक प्रभृती आठवतात ज्यांचे Physics आणि विशेषतः Astronomy या विषयांमधील कार्य शतकानुशतके नावाजलेले आहे. Astronomy तर अगदी सामान्य ग्रीक माणसाच्याही जगण्याचा एक भाग आहे. तर Astronomy, आयुष्य आणि मसाले अशा वेगळ्याच त्रिकोणावर बेतलेला हा चित्रपट मानवी आयुष्यावर आणि त्यातील खऱ्या अर्थाने महत्वाच्या गोष्टींवर अतिशय नेमकेपणाने भाष्य करतो.
या कथेचा नायक Fanis. एक Astronomy आणि Astrophysics चा अतिशय हुशार professor. त्याचे आजोबा त्याला बऱ्याच वर्षांनी भेटणार म्हणून प्रचंड खुशीत असलेला. आजोबाना आश्चर्याचा धक्का देण्यासाठी म्हणून त्याने आजोबांच्या जुन्या मित्रानाही घरी बोलावले आहे. पण काहीतरी बिनसते आणि आजोबा येणार नाहीत असे त्याला उमगते. त्याचे मन भूतकाळात जाते.
यानंतर खऱ्या अर्थाने चित्रपट सुरु होतो. लहानगा Fanis आणि त्याचे हुशार आजोबा या दोघांमधील अतिशय तलम नाते हळूहळू आपल्यासमोर उलगडत जाते. तीच गोष्ट Fanis व त्याची लहानपणीची मैत्रीण Saime यांच्यातील अनुबंधांची. स्वयंपाक करण्याची अतिशय आवड असलेला एक गोड मुलगा… आयुष्य त्याला किती वळणावळणाने उमगत जाते याची ही अतिशय सुंदर गोष्ट आहे. या मूळ कथेला जोड आहे ती ग्रीस आणि तुर्कस्थान यांच्यामधील संघर्षाची.
हा चित्रपट कथेप्रमाणेच त्याच्या cinematography साठीही अवश्य पाहण्यासारखा आहे. खास करून Fanis चे आजोबा त्याला ग्राहमालेचा आधार घेऊन मसाले व त्यांचे आयुष्यातील स्थान समजावत असतात तो प्रसंग तर पुन्हा पुन्हा पाहण्यासारखा.. त्यातील तत्वज्ञान समजावून घेण्यासाठी...
चित्रपट संपल्यावर वाटते की खरच आपल्या सर्वांमध्येही Fanis लपला आहे. अतिशय सुंदर स्वयंपाक करून फक्त त्यात मीठ टाकायला विसरलेला... आपणही शोधूया का आपल्या आयुष्यातील मीठ ?

विषय छान आहे, पण पूर्ण कथा वाचायला मिळाली असती तर खूप आनंद झाला असता
ReplyDelete