नमस्कार,
शीर्षक वाचून मी एकदम "भक्तिमार्ग हाच खरा मार्ग", यावर काहीतरी प्रवचन देणार आहे असा गैरसमज नको हं. तसे रूढार्थाने माझे आणि conventional अध्यात्माचे फारसे सख्य नाहीये. हां म्हणजे श्रद्धेवर श्रद्धा आहे आपली, पण ते तेवढंच. असो.
आज जुना डेटा चाळताना काही नेत्रसुखद रोषणाईचे व्हिडीओज दिसले. मन लगेच दोन महिने मागे गेले.
१४ नोव्हेंबरची त्रिपुरी अगदी स्पेशल होती माझ्यासाठी. सोमवार होता त्या दिवशी. आदल्या दिवशीच पिंकथॉन धावून वगैरे आले होते. त्या अनुभवाचा आनंद नसानसात already दौडत होता. तशातच मला काही दिवसांपूर्वी भावाबरोबर झालेले बोलणे आठवले. माझ्या माहेरी एक अतिशय पुरातन असे रामेश्वराचे मंदिर आहे. तिथे गेली दोन-तीन वर्षे त्रिपुरी पौर्णिमेला लेसर शो असतो असे त्याने सांगितले होते. मला या वर्षी मनापासून त्या अनुभवाचे साक्षीदार व्हायचे होते. पण पतिदेवांना वेळ नव्हता आणि चिरंजीवांची शाळा. नवऱ्याचे (अर्थात काळजीपोटी ) मत - "तू बसने जा. जीवाला घोर नको आणि ड्राईव्ह करायचे असेल तर एखाद्या मैत्रिणीला घेऊन जा". पण मला मात्र स्वतः ड्राईव्ह करत जायचे होते आणि ते ही "एकटा जीव सदाशिव " छाप. (माझे माहेर १५० किमी लांब आहे घरापासून ) शेवटी गोडीगुलाबीने त्याची समजूत घालत आणि "दर तासाने तुला फोन करेन" या (अतिशय वाजवी आणि योग्य ) अटीवर माझे एकटीने जायचे ठरले. सकाळी सातला गाडी सुरु केली तेंव्हा सोबत होती ती नवऱ्याच्या शुभेच्छांची, त्याने ठेवलेल्या विश्वासाची आणि अतिशय उत्तम संगीत भरून दिलेल्या पेन ड्राईव्हची... मजल दरमजल करत सकाळी पावणेअकराच्या सुमारास सुखरूप माहेरी पोचले तेंव्हा दोन्ही घरच्या माणसांनी सुटकेचा निःश्वास टाकला. आणि माझ्या मनाची अवस्था कशी वर्णन करू बरं?? काहीतरी नवीन गवसले होते त्यादिवशी.. स्वतःतलेच...स्वतःलाच..!! जणूकाही पंख फुटले होते, आत्मानंदाचे, समाधानाचे..!!!
तर ज्या अनुभवाच्या ओढीने मी माहेरी धाव घेतली होती त्या लेसर शो मधले काही क्षण शेअर करत आहे इथे ..
No comments:
Post a Comment