ह्या व्यक्तीने आल्यापासून आमच्या संपूर्ण आयुष्यावर आपला अनभिषिक्त हक्क प्रस्थापित केला आहे. इतका, की तो येण्यापूर्वी आम्ही कसे जगत होतो, असा प्रश्न पडतो कधीकधी !
याचे वय वर्षे फक्त तीन, पण आव असा कि सगळे काही समजते . जरा काही मनाविरुद्ध झाले की त्याच्या नकट्या नाकावर गोडुला राग उमटलाच म्हणून समजा ! गाल तर असे गोबरे, की कायमच स्वारी लाडू खात बसली आहे असे वाटते. कधी तो "छोटा भीम" असतो, तर कधी "spider man"! कधीकधी तो चक्क डॉक्टर काका होतो, आणि घरातील सगळ्यांना एकच औषध देतो. एरव्ही दवाखान्यात जायला घाबरणारे आपण, या पिटुकल्या डॉक्टर-काकाच्या अगदी प्रेमात पडतो.
घरातील सर्वांपेक्षा हा चिमुरडा बिझी आहे. तो सकाळी साडेआठला शाळेत जातो तो संध्याकाळी साडेसहा वाजता परततो. त्याची अंघोळ, त्याचे खेळणे, खाणे, धडपडणे, रडणे, सगळे काही एक नवीन अनुभव असतो, अगदी रोज !!
दिवसभराच्या थकव्याने तो लगेच झोपून गेला तरी आम्ही मात्र त्याच्या लांब पापण्याआड दडलेल्या टपोऱ्या डोळ्यात लपलेली स्वप्ने शोधायचा प्रयत्न करत असतो ....ती सर्व साकार होवोत म्हणून मनोमन आशीर्वाद देत असतो .... आमच्या काळजाच्या तुकड्याला ... अरिनला !!!

No comments:
Post a Comment