कालपरवाच पेपरमध्ये एक सुन्न करणारी बातमी वाचली- लहान मुलांच्या बेधुंद पार्टीची ! आज सकाळी टीव्हीवर त्याचसंदर्भात चर्चा चालली होती- मुलांमधील व्यसनांचे वाढते प्रमाण, त्यांच्यामधील बेपर्वाई, सतत नाविन्य मिळवण्याच्या ओढीपायी केलेले धाडस, वगैरे, वगैरे .
हे सर्व पाहून, ऐकून, अंतर्मुख झाले . मनात असंख्य प्रश्न पडले . वाटले - काहीतरी चुकत आहे नक्कीच ! पण त्याची जबाबदारी कुणा एका घटकावर टाकणे योग्य नाही . आपणा सर्वांनी मिळूनच कळत-नकळतपणे हे कोष विणले आहेत, आणि त्यात अधिकाधिक गुंतत चाललो आहोत . हा चक्रव्यूह भेदायचा असेल, तर किमानपक्षी पालकांनी थोडेसे आत्मचिंतन करणे अगदी गरजेचे झाले आहे . स्वतःला काही प्रश्न विचारून त्यांची परखड उत्तरे मिळवायलाच हवीत, आपल्या सर्वांच्याच निरामय आयुष्यांसाठी !!
प्रयत्न करायला काय हरकत आहे ? शेवटी आपल्या रोपट्याचा एक विस्तीर्ण वृक्ष व्हावा अशी इच्छा असेल तर त्याला नीट खतपाणी घालण्याची जबाबदारी आपलीच नाही का?
आणि सर्वात महत्वाची गोष्ट - रोज, हो अगदी रोज, आपल्या आनंदाच्या ठेव्याला जवळ घ्या ... त्याला मायेने स्पर्श करा .. त्याला कळू दे - तुमचे त्याच्यावर मनापासून निर्व्याज प्रेम आहे .... !! तुमच्या एका स्पर्शात त्याचे जग सामावले आहे ....!!
चला, आपण सर्व मिळून हे आयुष्य सुंदर बनवूया !! खूप उशीर होण्याआधीच .....!!

- निरोगी संततीसाठी आपण मनापासून प्रयत्न करतो, तसेच ते बाळ जन्माला आल्यावर त्याचे मानसिक संगोपन नीट होण्यासाठी विशेष प्रयत्न करणे, ही आपलीच जबाबदारी आहे, याची आपण सतत जाणीव बाळगतो का?
- आपले मूल आपल्याशी मोकळेपणाने बोलते का? तितकी संधी, व तेवढा वेळ आपण त्याला देतो का?
- दिवसातून किती वेळ आपण मुलांबरोबर मूल होऊन रमतो? आपण त्याला/तिला मोठ्यांच्या म्हणवल्या जाणाऱ्या कामांमध्ये थोडेतरी सहभागी होऊ देतो का?
- कुटुंबातील सर्वजण दिवसातून एकदातरी एकत्र जेवतो का? 'खरकटे हात तसेच आहेत, पण आपल्या गप्पा, चर्चा संपत नाहीयेत' असे सुंदर दृश्य आठवड्यातून किती वेळा आपल्या घरी दिसते?
- ' भिंतीवर रेषा ओढल्या, खेळणी नीट आवरली नाहीत, जेवताना अन्न खाली सांडले' या आणि अशा अनेक गोष्टी आपल्याला त्रासदायक वाटल्या, तरी त्याविषयी आपण मुलांना शांतपणे समजावतो का, की फक्त त्यांच्यावर ओरडतो?
- आपण मुलांना फक्त महागडे computer games आणून देतो, कि कधीकधी त्यांच्याबरोबर मैदानात जाऊन भरपूर खेळाचा आनंदही घेतो?
- स्वतःच्या हाताने लावलेल्या झाडाला आलेले पहिले फूल, रस्त्याने चालताना अचानक दिसलेला एखादा अनोळखी पक्षी, पहिला पाउस आल्यावर मातीला येणारा मंद सुगंध, आणि या सर्वामध्ये दाटलेला आनंद - याची ओळख आपण त्याला करून देतो का?
- आपल्या मुलाच्या मनात सभोवतालच्या जगाविषयी दडलेले कुतूहल आपण प्रामाणिकपणे शमवायचा प्रयत्न करतो का?
- आपल्या मुलांना नकार सहज पचवायची सवय आपण लावत आहोत का? हे करत असतानाच त्यांच्या आत्मसन्मानाला दुखापत होणार नाही, याची काळजी आपण घेतो आहोत का?
- आपल्या घराची ओढ आपल्या मुलाला वाटते की मित्र-मैत्रिणींबरोबरच ते जास्त रमते?
- कुटुंबातील सर्वजण मिळून कुठल्यातरी धमाल सहलीला गेले आहेत, असे चित्र किती दिवसांपूर्वीचे आहे ?
- उगाचच ओरडल्यानंतर कधी मनापासून मुलांची माफी मागितली आहे का? आपल्या स्वरातील सच्चेपणा त्याला जाणवला आहे का?
- आपले आईवडील कायम आपल्या पाठीशी असतील, अशी आश्वासक जाणीव त्याला आहे का? आपले निरपेक्ष प्रेम त्याच्यापर्यंत पोचते का?
- मुलांकडून सर्वच गोष्टीत यशस्वी होण्याची अपेक्षा ठेवतानाच काही वेळा अपयशही हसतमुखाने स्वीकारण्याची, व त्यातून बोध घेऊन पुढे जायची तयारी आपण ठेवतो का?
- त्याला नियमांचे पालन करायला सांगणारे आपण, कितीसे नियम स्वतः पाळतो? आपले वागणे त्याच्या नजरेत आदर्श आहे का?
- आपले पाल्य एक डॉक्टर, इंजिनियर व्हावे या अपेक्षेबरोबरच, ते एक चांगले नागरिक व्हावे, यासाठी आपण प्रयत्न करतो का? आपण स्वतः तशी वागणूक अंगीकारतो का?
- आपले मूल खूप बुद्धिवादी व्हावे अशी अपेक्षा ठेवतानाच, त्याचा बुद्धिवाद आपण handle कसा करत आहोत हे ही आपल्याला महत्वाचे वाटते का?
प्रयत्न करायला काय हरकत आहे ? शेवटी आपल्या रोपट्याचा एक विस्तीर्ण वृक्ष व्हावा अशी इच्छा असेल तर त्याला नीट खतपाणी घालण्याची जबाबदारी आपलीच नाही का?
आणि सर्वात महत्वाची गोष्ट - रोज, हो अगदी रोज, आपल्या आनंदाच्या ठेव्याला जवळ घ्या ... त्याला मायेने स्पर्श करा .. त्याला कळू दे - तुमचे त्याच्यावर मनापासून निर्व्याज प्रेम आहे .... !! तुमच्या एका स्पर्शात त्याचे जग सामावले आहे ....!!
चला, आपण सर्व मिळून हे आयुष्य सुंदर बनवूया !! खूप उशीर होण्याआधीच .....!!
No comments:
Post a Comment