नमस्कार,
तुम्ही आज times of India च्या Pune Times पुरवणीतली श्री. बच्चन यांची मुलाखत वाचलीत का? नक्की वाचा. अतिशय Polite, articulated, आणि तरीही precise and extremely straightforward. निमित्त आहे त्यांच्या आगामी "पिकू" या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे.
वयाची सत्तरी जाहीरपणे उलटून गेल्यावरही अजूनही प्रसिद्धीच्या शिखरावर विराजमान असलेले हे एक अजब व्यक्तिमत्व आहे - आयुष्यातील असंख्य चढउतारांना अतिशय gracefully सामोरे जाऊन त्या सगळ्या अनुभवांना पुरून उरलेले. मला स्वतःला त्यांची "angry young man" ही इमेज फारशी भावली नाही कधी (अपवाद फक्त जंजीर या चित्रपटाचा). पण मंजिल किंवा मिली सारख्या चित्रपटातील अतिशय भावूक असा नायक मात्र जवळचा वाटायचा. स्वच्छ, आणि खर्जातले, गांभीर्य जपणारे संवाद आणि जोडीला काळजाचा ठाव घेणारी नजर… खूप आवडून जायचे ते.
आता जेंव्हा या सगळ्याचा जास्ती rationally विचार करते तेंव्हा श्री. बच्चन यांच्या personality मधील इतर अनेक पैलू लक्षात येतात. माझ्या मते सर्वात महत्वाचा गुण म्हणजे the ability to move on... "रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा" या उक्तीप्रमाणे असंख्य अनुभव घेऊनही ते त्या सर्वांपासून वेळीच अलिप्त झाले. शेवटी माणसाचे true character हे ती व्यक्ती "from within" काय आहे त्यावरच ठरत असते हे त्यांच्या "स्वतःला कॅरी करण्याच्या "पद्धतीतून सतत जाणवत राहिले. पडद्यावरची characters आणि प्रत्यक्षातील ते यामध्ये त्यांनी जाणीवपूर्वक अंतर ठेवले. चित्रपटातील भूमिकांचा विचार अतिशय "professionally" केला. कदाचित म्हणूनच त्यांच्याविषयीचा लोकांचा आदर दिवसेंदिवस वाढतच गेला असणार. जोडीला अतिशय मेहनत करण्याची तयारी आणि सतत नवीन काहीतरी शिकत राहायची वृत्ती… सगळेच थक्क व्हायला लावणारे.
त्यांच्या नवीन चित्रपटाला अनेक शुभेच्छा … !! आणि हो, ती मुलाखत मात्र जरूर वाचा. :)
No comments:
Post a Comment