नमस्कार,
माझ्या चिमुटभर वाचकांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा...
मागच्या पोस्ट नंतर कितीतरी वेळ गेला मध्ये. मनात विचार तर येतच होते पण ते ब्लॉगवर काही उतरत नव्हते. वेळाची वाळू हातातून कधी निसटली कळलंच नाही. आज लिहीन, उद्या नक्की लिहीन… शेवटी आज मुहूर्त लागला एकदाचा :)
तर, आजचा लेख एका रंगवेड्याला समर्पित. मध्यंतरी फेरारीची एक अप्रतिम advertisement YouTube वर पाहण्यात आली होती. त्यामधील photographer चे तंत्र, त्याने वापरलेली उत्कट रंगांची आरास, सगळे एकदम खिळवून ठेवणारे होते. त्या अवलियाचे नाव Fabian Oefner. मग थोडे खोलात शिरून शोध घेतला असता त्याच्या Liquid Jewels, Orchid, आणि Black Hole या थीम्स वर आधारित फोटो सिरीजची माहिती मिळाली, आम्ही तर अगदी भारावून गेलो. किती ती उत्सुकता, मेहनत, अभ्यास आणि त्या सगळ्यांच्या परीपाकातून साधलेले precision.. निव्वळ अप्रतिम. खाली दिलेल्या लिंक्स नक्की बघा. तुम्हीही खात्रीने प्रेमात पडाल. :)
१) Photographing Natural Forces: https://www.youtube.com/watch?v=FAs6ILaXSPM
२) Ferrari: https://www.youtube.com/watch?v=2Cp-fpEYzB0
३) Psychedelic Science : https://www.youtube.com/watch?v=Mh3_wYHdeVs
No comments:
Post a Comment