Monday, April 4, 2011

सृजनाची ही असे घडी, चला उभारू उंच गुढी...!!





तो फुलांनी गच्च बहरलेला गुलमोहोर, ती कोकीळा, तो अशोकवृक्ष, ती आंबा व कडुनिंबाची कोवळी पालवी, तो मोगऱ्याचा गंध काय बरे सांगत आहेत? ती सकाळची प्रफुल्लीत सूर्यकिरणे कोणाचे स्वागत करीत आहेत ? 
कालपर्यंत सोबतीला असलेली मनावरची मरगळ अचानक कुणी निपटून काढली आहे? ही त्या चैत्राची किमया तर नव्हे? मग प्रवीण दवणे म्हणतात तशी खरच ही 'चैत्रपालवी' नव्हे तर ' मैत्रापालवी' आहे... शांताबाई शेळके यांनी या रुतूराजाचे स्वागत किती समर्पकपणे केले आहे..
गगना गंध आला, मधुमास धुंद झाला
फुलले पलाश रानी, जळत्या ज्वाला.. !!

आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ..!
नूतन वर्षाभिनंदन.....!!!



2 comments:

  1. गुढीपाडव्याच्या निमित्याने आज तू खूप दिवसांनी post टाकला आहेस, वाचून छान वाटले. नवीन वर्षात असेच काही छान वाचायला मिळेल अशी अपेक्षा करते. तुला पण गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

    ReplyDelete
  2. मी नक्क्की प्रयत्न करेन .. तू पण मला comments टाकून motivate करत राहा...!!

    ReplyDelete

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...