देणार्या ज्या काही मोजक्याच गोष्टी आहेत त्यात पूर्णचंद्राचा नंबर बराच वरचा लागतो.
आणि त्यात आज तर काय, शारदीय पौर्णीमा किन्वा नवान्न पौर्णीमा.
मनाला उत्साह नाही वाटला तरच नवल !
तो नुकत्याच कापलेल्या पिकांचा मंद वास, ती हवेत येउ घातलेली थंडीची हवीहवीशी
वाटणारी शिरशिरी, ४-५ दिवसांपूर्वी होउन गेलेल्या दसर्यामुळे उत्साही झालेले
वातावरण आणि या माहौलात ती आकाशातील चांदोमामांची दिमाखदार एंट्री !
गोजिरे प्रतिबिंब डोळाभर पाहायचे आणि प्रियजनान्सोवत गप्पागोष्टी करण्यात,
'को जागरति? ' असा प्रश्न विचारणार्या देवीचे स्वागत करण्यात पूर्ण रात्र जागवायची.
अशक्य आहे का हे? थोडे ठरवून तर पाहा, या चांदण्यात चिंब होउन तर पाहा,
प्रियजनांबरोवर सगळे रुसवे-फुगवे विसरून थोडीशी मौजमजा करून पाहा,
आयुष्य अचानक सुंदर वाटायला लागेल.
' The best things in life are free' - हे अगदी पटेल.
जगणे refresh करण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेसारखा दुसरा दिवस नाही असे मला वाटते.
हा चंद्रमा तुम्हाला आवडेल तेथून पाहा- एखाद्या निवान्त समुद्रकिनारी, गड-किल्ल्यांच्या सहवासात ,
एखाद्या सुंदर फुलानी डवरलेल्या बागेत बसून , दूर माळरानात -आणि यापैकी काहीच जमले नाही
तर किमान घरातील गच्चीवरून तरी- पण ह्या अमृतधारा अंगावर घ्याच. हे क्षण तुम्ही
हृदयाच्या कुपीत नक्की जपून ठेवाल, मला खात्री आहे.
तेंव्हा तुम्हाला कोजागिरीच्या मनापासून शुभेच्छा! ते वर ग्लासेस दिसत आहेत ना , ते उचला आणि म्हणा ' CHEERS !!'