Friday, October 22, 2010

चांदणे शिंपीत जा.. अर्थात कोजागिरी पौर्णीमा!

तसे सौंदर्य हे पाहण्याच्या नजरेवर ठरत असले तरीही जगात सर्वाना सारख्याच प्रमाणात आनंद 
देणार्या ज्या काही मोजक्याच गोष्टी आहेत त्यात पूर्णचंद्राचा नंबर बराच वरचा लागतो.
 आणि त्यात आज तर काय, शारदीय पौर्णीमा किन्वा नवान्न पौर्णीमा.
मनाला उत्साह नाही वाटला तरच नवल !
तो नुकत्याच कापलेल्या पिकांचा मंद वास, ती हवेत येउ घातलेली थंडीची हवीहवीशी 
वाटणारी शिरशिरी, ४-५ दिवसांपूर्वी होउन गेलेल्या दसर्यामुळे उत्साही झालेले 
वातावरण आणि या माहौलात ती आकाशातील चांदोमामांची दिमाखदार एंट्री ! 





त्या तेजोमय आनंदास ,खास आटीव मसाल्याच्या दुधाचा नैवेद्य दाखवायचा, त्याचे 
गोजिरे प्रतिबिंब डोळाभर पाहायचे आणि प्रियजनान्सोवत गप्पागोष्टी करण्यात, 
'को जागरति? ' असा प्रश्न विचारणार्या देवीचे स्वागत करण्यात पूर्ण रात्र जागवायची. 




कोणी म्हणेल की आजकाल इतके सोपस्कार करायला वेळ कुठून आणायचा? पण खरच
 अशक्य आहे का हे? थोडे ठरवून तर पाहा, या चांदण्यात चिंब होउन तर पाहा, 
प्रियजनांबरोवर सगळे रुसवे-फुगवे विसरून थोडीशी मौजमजा करून पाहा,
 आयुष्य अचानक सुंदर वाटायला लागेल. 
' The best things in life are free' - हे अगदी पटेल.
 जगणे refresh करण्यासाठी कोजागिरी  पौर्णिमेसारखा दुसरा दिवस नाही असे मला वाटते. 
हा चंद्रमा तुम्हाला आवडेल तेथून पाहा- एखाद्या निवान्त समुद्रकिनारी, गड-किल्ल्यांच्या सहवासात , 
एखाद्या सुंदर फुलानी डवरलेल्या बागेत बसून , दूर माळरानात -आणि यापैकी काहीच जमले नाही
 तर किमान घरातील गच्चीवरून तरी- पण ह्या अमृतधारा अंगावर घ्याच. हे क्षण तुम्ही
 हृदयाच्या कुपीत नक्की जपून ठेवाल, मला खात्री आहे. 
तेंव्हा तुम्हाला कोजागिरीच्या मनापासून शुभेच्छा! ते वर ग्लासेस दिसत आहेत ना , ते उचला आणि म्हणा ' CHEERS !!' 

No comments:

Post a Comment

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...