मी एक साधीसुधी नोकरी करणारी व थोडीफार 'लेखकुगिरी' करण्याची आवड असलेली व्यक्ति.. ही हौस भागवण्यासाठी 'मनोगत' सारख्या ब्लॉग वर लिखाण केले. पण नंतर वाटले की आपणच ब्लॉग का सुरु करू नये? म्हणून हा ब्लॉग... 'मराठी सुमने'... अशा सर्वांसाठी ज्यांचे रोजच्या जगण्यावर मनापासून प्रेम आहे... त्यातून गवसलेल्या निरागस अनुभवाना share करण्यातली गम्मत माहीत आहे...
पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत !!
माझा काही दिवसांपूर्वी 'मनोगत' वर प्रकाशित झालेला एक लेख इथे जोडत आहे..
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मी अशा काही सुखी जीवांपैकी एक ज्याना खेड्यातले आयुष्य खूप काळ उपभोगता आले. माझे माहेरचे घर "खेड्यामधले घर कौलारु" या गाण्यामधून उचलून आणलेले... लांबरुंद, ऐसपैस तरीही थोड्याश्या अंधारलेल्या ओटी, पडवी, माजघर अश्या खोल्या, पण आतील माणसांची मने मात्र कायमच सूर्यप्रकाशासारखी उल्हसीत, आणि टवटवीत ! साहिजकच आमच्या घरात कायम सर्वांचा राबता असयचा. हे सर्व म्हणजे माणसांबरोबरच मांजरे,कुत्रा, कावळे, आणि अगदी खारुताई सुद्धा! माझी आईपण 'अतिथि देवो भव' या उक्तीला जागून दारावर आलेल्या गारुड्यालाही उपाशीपोटी परत पाठवायची नाही.
अशीच एक दिवस एक भाटी (मांजरी) आमच्याकडे आली. बहुतेक ती तिच्या येणारया बाळान्साठी सुरक्षीत ठाविठकाणा शोधत असावी. ही बया पाहुणी म्हणून आली आणि घरचीच होऊन गेली. काही दिवसानंतर एक दिवस कोठीच्या खोलीतून दोन गोड आवाज आमच्या माऊच्या पुनर्जन्माची चाहूल घेऊन आले. माझ्या आईची बाळबाळंतीणीचे कोडकौतुक करण्यासाठी लगबग सुरू झाली. आमच्या माऊला दोन गोंडस मुलगे झाले होते. आम्ही त्यांची नावे ठेवली जॉन आणि जेम्स !
तसे पाहता कुठलेही पिल्लू हे सुंदरच दिसते पण त्यातही मांजराची पिल्ले म्हणजे खासच.. दोघांपैकी जेम्स जास्त गोरा तर जॉन सम्पूर्ण उदी रंगाचा! त्याच्या कपाळावर रुपायाच्या आकाराचा डार्क उदी रंगाचा ठिपका एकदम खुलून दिसायचा. या दोघांच्या खोड्या बघताना वेळ कसा जायचा हेच कळायचे नाही.. थोडा मोठा झाल्यावर जेम्स त्याचे नशीब आजमावायला घराबाहेर पडला आणि जॉन मात्र आमच्याजवळच राहिला .. जॉन घरातलाच एक जसा काही.. मांजराना थोडेसे लांबच ठेवणार्या माझ्या बाबानाही त्याचा इतका लळा लागला की आता देवपूजेनंतरचे नैवेद्याचे दूधही आम्हाला िमळेनासे झाले. आणि जॉनही ते दूध् िमळवण्यासाठी बाबांची बराच वेळ चाललेली पूजा अगदी मन लावून बघू लागला..
त्याची ती पायात घोटाळण्याची तर्हा इतकी लडीवाळ असायची की आम्हाला त्याचा कधीच कंटाळा आला नाही. त्र जॉनची सोबत आम्हाला आपली, हक्काची वाटायची. खूप वेळ अभ्यास करून िशणवटा आला की जॉनचा रेशमी स्पर्श अगदी हवाहवासा वाटे. आपल्या पाठीवरच्या छोट्या भावंडांचे लाड करणारा जोनसारखा शान्त, समजुतदार बोका माझ्यातरी पाह्ण्यात नाही.
२००० सालची गोष्ट. आम्ही आमचे घर बांधायला घेतले होते. त्यावेळी आमचा वावर जास्ती करून बेड्यात (बेडे - गाइगुराना ठेवण्याची जागा)असायचा. बेडे साफ करून आई तिथेच स्वयंपाक करायची. ते दोन महीने मोठे कठीण होते. या सर्व दिवसांचा जॉन आमच्याबरोबरीने साक्शीदार होता. एक दिवस आई बेड्यात जात असताना जॉन तिला सारखा अडवत होता. थोडेसे वैतागून , जॉनला बाजूला सारून ती आत गेली आणि तिथे बघते तर एक साप नुकताच मरून पडला होता..! त्या दिवसापासून आमच्या मनात जॉनबद्दल प्रेमाबरोबरच कृतज्ञतेची भावनापण निर्माण झाली.
पुढे मी उच्च िशक्शणासाठी मुंबईला आले तरी माझ्या आठवणीन्वर घरच्यान्बरोबर जॉनचाही तेवढाच हक्क होता. त्यावर्षीच जेव्हा मी नाताळच्या सुट्टीत घरी आले तेव्हा जॉनलाही खूप आनंद झालेला िदसला. त्याच्याबरोबर मनसोक्त खेळले. त्यानंतर तो रात्री कुठेतरी गेला.
दुसर्या िदवशी सकाळी 'जॉन अजून कसा घरी आला नाही ' म्हणत आईने जेंव्हा स्वयंपाकघराचे दार उघडले तेव्हा ितला तेथे जॉनचे नीष्प्राण शरीर पडलेले िदसले... बहुदा उंदीर मारण्यासाठी घातलेले औषध त्याच्या पोटात गेले असावे.. पहिल्यांदाच मी बाबाना इतके हमसून हमसून रडताना पाहिले ..... नंतर जॉनला जेथे पुरले तेथे आम्ही एक फुलझाड लावले. जॉनच्या सुगंधी स्म्रुती जपण्यासाठी...!
मांजर हा विषय त्यानंतर माझ्यातरी आयुष्यातून कायमचा बाद झाला...!!

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
- टीप - फोंट मधील चुकांसाठी आधीच माफी मागते. ..

hey dear, nice try.i didn't know u can write so well. i will try to follow ur blog as and when possible. good luck for that
ReplyDeletethanks ketki for comment. keep visiting..
ReplyDelete