Friday, October 8, 2010

तुम्ही घर घेताय का घर?

आपल्यापैकी प्रत्येकानेच हे स्वप्न उरी जपलेले असते. कुणाला समुद्रकिनारी बंगला हवा असतो तर काहींना डोंगराच्या कुशीत लपलेले छोटेसे घरकुल. कोणाला 3 BBK penthouse हवे असते तर  कोणी आयुष्यभराची कमाई साठवून गावाकडे घर बांधायचे स्वप्न पाहात असतो. इच्छा  काहीही असोत, पण काही गोष्टींचा विचार मात्र सर्वांनीच करायला हवा. घर घेण्यापूर्वी काही प्रश्नांची उत्तरे शोधणे अगदी गरजेचे आहे. असेच काही प्रश्न मी खाली देत आहे. आमच्या अनुभवाचा काही जणांना जरी उपयोग झाला तरी  आम्हाला आनंदच होईल. खालील सल्ले हे प्रामुख्याने मध्यमवर्गासाठी व ज्याना आपली कमाई हुशारीने वापरून थोडातरी मनस्ताप  टाळायचा आहे, अशांसाठी आहेत.
 १) सर्वात पहिला मुद्दा येतो तो अर्थातच budget चा. त्यासाठी thumb-rule असा की, जेवढे तुमचे बजेट असेल त्यापेक्षा किमान ४  ते ५ लाख रुपये कमी किमतीचे घर शोधायला हवे. कारण वरचे पैसे हे stamp-duty, registration, society-ट्रान्सफर, मध्ये broker  असेल तर त्याचे brokerage, वकील असल्यास त्यांची फी, या सर्वांसाठी उपयोगी पडतील. इथे मी आमच्या अनुभवांवरून सांगू शकते की जर आपण सर्वद्य आहोत अशी आपली समजूत(खरेतर गैरसमज) नसेल तर आपण वकील जरुर appoint करा. कारण प्रत्यक्ष deal सुरु असताना अनंत अडचणी येतात व प्रत्येक गोष्टीची कायदेशीर बाजू आयत्यावेळी पडताळून पाहाणे दरवेळी जमेलच असे नाही. याउलट विश्वासू वकील आपले हे काम अगदी सोपे करून टाकतो.
२) दुसरे म्हणजे ते घर आपल्याला कोणत्या कारणासाठी हवे आहे याचा विचार करा. ती फक्त investment आहे की आपण तिथे राहणार आहोत? याचे उत्तर शोधा. कारण ती जर investment असेल तर ५ किंवा १० वर्षानी त्याची resale value किती असेल याचा अंदाज़ घ्यायला हवा. पण जर आपण तिथे राहणार असू तर काही वेगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळवावी लागतील. जसे की तिथपर्यंत पोहोचण्यासाठी approach road चांगला आहे ना, जसे की चारचाकी साठी रस्ता वगैरे. आजुबाजुला वस्ती कशी आहे? आपल्या गरजेच्या सर्व गोष्टी जवळच उपलब्ध आहेत का? जर आपल्या घरात लहान मुले असतील तर त्यांच्यासाठी शाळा-कॉलेजेसचे  अंतर किती आहे? दवाखाना, भाजिमार्केट, वाणी, आणि आजकाल अगदी beauty-parlor, laundry, medical store, dvd/vcd retal, cyber cafe या गोष्टी सुद्धा किती अंतरावर आहेत वगैरे... या list मध्ये आपल्या गरजेनुसार फेरफार होऊ शकेल. पण महत्वाचे म्हणजे अशी यादी जर आधीच तयार असेल तर आपले जागा शोधणे थोडेसे सोपे नक्कीच होइल. पब्लिक ट्रांसपोर्ट जसे की  बस, ऑटो, taxi आदींची सोय आहे का हे पाहणेही गरजेचे आहे.  
३) वरील सर्व झाल्या घराबाहेरील गोष्टी. पण प्रत्यक्ष घराचा विचार करताना खालील बाबींचा विचार आधीच करून ठेवल्यास पुढचे सगळे त्रास व त्यायोगे होणारे नुकसान वाचेल.
         घराचा built-up area व carpet area यामध्ये किती तफावत आहे? थोड्याश्या जुन्या society मध्ये हे अंतर  जवळपास २०% असते. तर नवीन बांधकामात built-up एरिया calculate करताना त्यामध्ये घराबाहेरील जागा जसे की corridor, stair-cases, car-parking वगैरे यांचाही समावेश होतो. म्हणून नवीन society मध्ये जरी 1200 sq.feet. built-up (actually super built-up) असे कागदोपत्री म्हटले असेल तरी त्याची carpet value ही typically 750 -850 sq. feet मिळते हे लक्षात घ्यायला हवे. यात जागेचा lay-out महत्वाची भूमिका बजावतो. तो बारकाईने बघून घ्यायला हवा. काही गोष्टी, जसे की kitchen चा lay-out, modular kitchen करण्याची सोय आहे का? dining टेबलासाठी जागा आहे का? भांडी व कपडे धुण्यासाठी स्वतन्त्र dry-balcony आहे का ज्यायोगे कामवाल्या बाईचा kitchen अथवा bathrooms मधील वावर कमी होईल. कपडे वाळत घालण्यासाठी  स्वतन्त्र टेरेस आहे का? बेडरूम्स मध्ये आवश्यक furniture जसे की master-bed, dressing table, side table, 4-door wardrobe (typically for a couple and their small child) ठेवायला पुरेशी जागा आहे ना? एकंदरीत पूर्ण घराचाच lay-out  हा राहणार्या माणसानसाठी सोयीचा  आहे na? वगैरे. खासकरून kitchen, जो पूर्ण घराचा आत्मा आहे, त्यासाठी तर काही गोष्टी आवर्जून बघायलाच हव्यात- जसे की जर modular-kitchen करून घेतले तर मोठी भांडी, काचेच्या वास्तु, वेगवेवळ्या आकाराचे चमचे, वाट्या-भांडी, ताटे, पातेली, आपल्या रोजच्या वापरातील गोष्टी जसे की kitchen-towels,  वाणसामान तसेच दुधाचा हिशोब असलेल्या diaries, tissue papers व वेगवेवळ्या साइज़ मधील plastic-bags (e.g.dustbin bags, zip-lock bags) , gas lighter, screw-drivers, कात्री वगैरे ठेवायला पुरेशी जागा आहे ना? रोजची उपकरणे जसे की fridge, micro-wave, food-processor/mixture,  वगैरेंसाठी पुरेसे electric-points आहेत ना? washing-machine ठेवायला जागा आहे का? वगैरे. या सर्व गोष्टी वरवर पाहता खूप trivial वाटतात पण त्यांच्यावाचुन होणारी गैरसोय ही खूप मोठी असते. म्हणून त्याची वेळीच काळजी घेतलेली बरी !
४) आता थोडेसे व्यवहारासम्बन्धी.. घर घेताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तया घराची कागदपत्रे. एकवेळ ले-आउट वगैरे बद्दल थोडासा compromise  करावा  लागला तरी चालेल पण documents संबंधात रिस्क नकोच. घरासम्बंधातील महत्त्वाची कागदपत्रे, जसे की sale-deed, title-search report, conveyance deed of the society with the builder(if the society is formed), sanctioned-plan वगैरे नीट पडताळूनच घ्यायला हवीत. अर्थात documents आणि bank-loan घेत असल्यास त्याविषयीची काळजी हा स्वतन्त्र लेखाचा विषय आहे. त्याविषयी पुढच्या भागत..
तेन्व्हा थोडक्यात काय तर घर घेताना, घराच्या आतील गोष्टींसाठी 'Place for Everything and Everything in Place' हे सूत्र वापरले तर तिथे राहाणे हा नक्कीच एक सुखद अनुभव असेल...!!

1 comment:

  1. खूप उपयुक्त माहीती ! आमचे डोंबिवलीला घर आहे ते असेच आहे. घराच्या खाली उतरल्यावर सर्व काही. २४ तास पाणी, भरपूर उजेड,
    मी आणि माझी तिथे राहणारी मैत्रिण फोनवर नेहमी बोलत असतो की आपली ही जागा अजिबात सोडाविशी वाटत नाही. मी मूळची
    पुण्याची असल्याने मला पुण्यात घर घ्यावे का असा विचार नेहमी येतो. घर म्हणजे राहण्यासाठी. पण नंतर असाही विचार येतो की डोंबिवलीतली
    जागा सोडून पूण्यात घ्यायची असेल तर खाली उतरल्यावर सर्व काही उपलब्ध ! अशी जागा मिळेल का? छान लेख आहे तुझा.
    सर्व गोष्टींचा विचार करायला हवा हे अगदीच खरे.

    ReplyDelete

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...