Tuesday, April 21, 2015

फक्त एक श्वास…

नमस्कार,

गेले काही दिवस मी एक खूप सुंदर अनुभव घेत आहे - श्वासाच्या जाणीवेचा. जे लोक नित्यनेमाने मेडीटेशन करतात त्यांना हा रोजचाच अनुभव असेल. त्यामुळे हा लेख खास माझ्यासारख्याच "अचपळ मन माझे नावरे नावरिता' वाल्या मानसिकतेच्या लोकांसाठी आहे.

काय आनंद असतो म्हणून सांगू स्वतःचाच स्वतःशी चाललेला मुक्त संवाद अनुभवण्यात… जास्त काही लागत नाही आणि त्याला. घरातला कुठलाही शांत कोपरा आणि सकाळची शुचिर्भूत वेळ. आपण काहीच करायचे नाही. नुसते डोळे मिटून बसायचे. आणि जमेल तेवढा मनापासून दीर्घ श्वास घ्यायचा प्रयत्न करायचा. मग आणखीन एक… मग त्यापुढचा. इतकेच…

काय काय चालू असते हो आपल्या मनात ! - कुकरची शिट्टी बंद केली का?  - back to breathing - ह्या महिन्यासाठी finance जरा नीटच manage करावा लागणार आहे बहुतेक…. back to breathing - manager has sent a nice note of appreciation, waw ! .... back to breathing... मला खरंच वजन "क्ष" इतके करायचे आहे. काय मज्जा येईल. मग मी तो त्यादिवशी पाहिलेला ड्रेस घेईन…. and back to breathing... काल बाळ थोडं कमीच जेवलं का? थोडा बारीकच वाटतोय तो. … and back to breathing...

आले नं लक्षात मला काय म्हणायचे आहे ते? :)

पण महत्वाचे काय तर "back to breathing" मग कधीतरी ती लय सापडते. आपण नकळतपणे श्वासांचा rhythm enjoy करू लागतो. We start appreciating the moment.. the very present.. सगळे गुंते कसे अलवारपणे सुटल्यासारखे वाटतात. समोरचा मार्ग, आजचा दिवस डोळ्यासमोर स्वच्छ उभा राहतो. का कोण जाणे, पण मनात एक खोल समाधान शांती झिरपल्यासारखी वाटते. मी तर निसर्गाचे आभार मानते त्यावेळी- आजचा नवानितळ दिवस मला अनुभवायला दिल्याबद्दल ….

 

No comments:

Post a Comment

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...