Thursday, April 23, 2015

जाधवगड : लढ, झगड, आगे बढ :)

 नमस्कार,

तुम्हाला प्रवास आवडतो का हो? मला वाटते की बहुतेक आवडत असावा. मला तर खूप आवडतो. स्वतःपासून वेगळे होऊन थोडे introspection करायची एक उत्तम संधी म्हणून.

कालच मी आणि ऑफिसमधील माझे सहकारी जाधवगड ला जाऊन आलो. ही एकेकाळची गढीच पण आता श्री. विठ्ठल कामतांनी तिचे हॉटेलमध्ये रुपांतर केले आहे. पुण्यापासून साधारण तीस किलोमीटर अंतरावरची ही जागा म्हणजे एका दिवसात रिफ्रेश व्हायचे एक मस्त ठिकाण आहे. अप्रोच रोड थोडा किचकट आहे पण it's worth the efforts. ज्यांना काही दिवस मुक्काम करायचा आहे अशांसाठी राहण्याची पण उत्तम सोय आहे. गढीचा antic, ancient लुक जपत सगळ्या रूम्समध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत कामतांनी. :) त्यामधील दोन खास सूट्स - महाराजा व महाराणी- यांची भाडे तर दिवसाला २० ते २५ हजाराच्या दरम्यान आहे.

आम्ही सर्व जवळपास  सकाळी साडेनऊच्या सुमारास पोचलो तिथे. पोचल्यावर एका जंगी तुतारीने आमचे स्वागत झाले. हो, एवढा गड सर केला होता नं दहा वीस पायऱ्यांचा. :) आणि आम्हाला लगोलग थंडगार लिंबू सरबत देण्यात आले. तिथे एक अतिशय जड पाटा-वरवंटा ठेवला होता. तो वरवंटा हातात घेऊन दहा पुशप्स करणाऱ्याला surprise gift होते. माझी US मधील बॉस हौशीने पुढे सरसावली आणि तिने गिफ्ट मिळवले देखील. :)

सगळ्यांच्या पोटात कावळे कोकलत होते म्हणून आम्ही पुढे आलेल्या नाश्त्याचा भरपेट समाचार घेतला. मेन्यू वरील एकूण एक इटेम्स अप्रतिम होते. नाश्ता झाल्यावर आम्ही सर्वजण गडाची सैर करायला निघालो. गडावरील वस्तुसंग्रहालय आवर्जून बघण्यासारखे आहे. कामतांच्या पर्सनल कलेक्शन मधील असंख्य जुन्या गोष्टी तिकडे पाहायला मिळतात. साधारण राजा केळकर म्युझियम सारखाच प्रकार आहे पण तरीही ३०० वर्षांपूर्वीच्या गोष्टी पाहायला खूप मजा येते.
या परिसरात झाडेही खूप आहेत. एक चक्क बकुळीचे झाड आहे. तास-दोन तास फिरल्यावर पुन्हा भुकेने कब्जा घेतला. :) मग मनपसंत लंच, आणि खूप साऱ्या गप्पाटप्पा. हसणे-खिदळणे फोटोग्राफी… वेळ कसा उडाला कळलेही नाही.

परतल्यावर इतके रीफ्रेश्ड  वाटतेय म्हणून सांगू ! असा अधेमधे एक ब्रेक तो बनता ही बॉस. What say? :)


 

No comments:

Post a Comment

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...