Monday, December 19, 2011

प्रेम भावे जीव जगी या- अर्थात संगीत मानापमान..

बरयाच दिवसांनी रविवारची संध्याकाळ अगदी हवी तशी, कल्पनेतली घालवता आली..
स्थळ: यशवंतराव चव्हाण नाट्यगृह.
नाटक: (पुन्हा नव्याने, नव्या संचात) संगीत मानापमान..
माझे सासूसासरे काही दिवस आमच्याकडे राहायला आले आहेत. आमच्या घरात सर्वच संगीतातील दर्दी! (अर्थात माझा अपवाद वगळता..) त्यामुळे मानापमान पुन्हा रंगभूमीवर आले आहे, आणि त्याचे पुण्यात चारच प्रयोग होणार आहेत, हे कळल्यावर माझ्या सासऱ्यांनी लगेच त्याची पाच तिकिटे काढून आणली सुद्धा! (कालचा प्रयोग आमच्यासाठीही एका गोष्टीचा शुभारंभ करण्याचा होता - माझ्या अडीच वर्षाच्या पिल्लाला आम्ही पहिल्यांदा theatre मध्ये नेणार होतो. चांगली गोष्ट अशी, कि माझा मुलगा खूप लहानपणापासूनच नाट्यगीते, भावगीते, आणि अगदी मोझार्टच्या symphonies असे अनेक प्रकार अगदी तल्लीन होऊन ऐकतो. त्यामुळे तो कदाचित एकंदरीत नाटकाचे वातावरण, त्यातील पदे enjoy करेल असा आमचा होरा होता - जो सुदैवाने खरा ठरला.. :))
एखाद्या लग्नाला जाताना जशी तयारी करू ना आपण, तसा नट्टापट्टा (!) करून आम्ही सर्वजण वेळेच्या अर्धातास आधीच यशवंतराव ला पोहोचलो. (हो, पार्किंग चा problem नको..). शुभारंभाचा प्रयोग असल्यामुळे खरोखरच सनई-चौघडे, रांगोळी असे अगदी लग्नाचे वातावरण होते.. इतके छान वाटले म्हणून सांगू..!!
मूळ नाटकाच्या संहितेला धक्का न लावता, त्यातील पदांची लांबी थोडी कमी करून, राहुल देशपांडे, सायली पानसे आदी कंपूने, तीन तासांचा अगदी देखणा प्रयोग उभा केला आहे...
ज्यांनी मूळ मानापमान पहिले आहे, त्यांना हा प्रयोग कितीसा पटेल ते मला माहित नाही - पण माझ्या मते तरी अशी तुलना करून आपण, जे मनापासून एखादी जुनी गोष्ट पुन्हा तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचे श्रम हिरावून घेतो. तेंव्हा माझ्याकडून तरी या सर्व टीमला त्यांच्या अथक प्रयत्नांबद्दल मनापासून धन्यवाद...आणि खरे सांगू का, काही काही गोष्टी, विशेषतः. projector चा केलेला अफलातून वापर {खास करून भामिनी तयार होताना आरशात पाहत आहे तो प्रसंग..}, राहुल देशपांडे आणि सायली पानसे ची गायकी ह्या खरोखरच खूप खूप स्तुत्य आहेत..!!
आणखीन एक गोष्ट - हे नाटक म्हणजे अतिशय दर्जेदार नाट्यगीतांची खाणच आहे.. मी सकाळी office ला आले तरीही , तो hangover काही ओसरला नव्हता! खास करून, 'प्रेम भावे जीव जगी या' हे नाट्यगीत ऐकावेसे वाटले (कारण इतर बरीच नाट्यगीते सहज available आहेत महाजालावर..). मग काय, search केले, आणि खाली दिलेल्या लिंक वर खजिनाच मिळाला. आपणही जरूर भेट द्या -

http://gaana.com/#/streamalbums/Manapman_Drama_२२८१८



No comments:

Post a Comment

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...