नमस्कार,
पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय- अर्थात खादाडी.
आता तुम्ही म्हणाल की जर दसरा स्पेशल असे शीर्षक आहे तर नक्कीच ही श्रीखंडाचा कुठलातरी प्रकार टाईपणार असेल. :) पण अरिनमेवा हा काय प्रकार आहे? सांगते.
अरिन म्हणजे आमच्या सुपुत्राचे नाव आणि त्याच्यासाठी केलेला खाऊ म्हणजे अरिनमेवा. :) (थोडेसे 'रानमेवा' सारखे. :) )
त्याला आवडते म्हणून गेल्या आठवड्यात जवळपास ५ लिटर दुधाचे श्रीखंड करून ठेवले होते, आणि त्यातले तो रोज थोडेथोडे इमाने-इतबारे संपवत होता. :) त्यामुळे आमच्याही सर्वांगाला मुंग्या चिकटतील कि काय, अशी शंका येण्याइतपत साखर खाऊन झाली होती. तेंव्हा म्हटले की दसऱ्याला पुन्हा साखरेने ओथंबलेले पक्वान्न करण्यापेक्षा दुसरे काहीतरी ट्राय करावे. (सौ चुहे खाके .... दुसरे काय) ! ह्या सुविचारातून जन्म झाला आजच्या लाडवांचा !! आता इतके पुराण सांगून झाल्यावर कृती सांगू का? :) तर-
साहित्य-
जाडसर कणिक २ वाटया
जाड मुगाचे पीठ १ वाटी
बदाम पावडर अर्धा वाटी
खारीक पावडर, तीळ पावडर, खसखस पावडर हे सगळे मिळून अर्धा वाटी
ओला खजूर एक वाटी
तूप दीड वाटी
पिठीसाखर ५ मोठे चमचे
कृती-

- प्रथम ओला खजूर तीन-चार तास भिजत टाकावा. मग त्यातील बिया काढून टाकाव्यात आणि मिक्सरमधून त्याची गुळगुळीत पेस्ट तयार करून घ्यावी.
- बदाम ३-४ तास भिजत टाकून साले काढून घ्यावीत व बदामांचीही पावडर तयार करून घ्यावी.
- तीळ व खसखस खमंग भाजून घ्यावे आणि त्यांची पण पावडर करून घ्यावी. खारीक पावडर तयार बाजारात मिळते.
- मग एक वाटी तुपात कणिक खमंग भाजून घ्यावी. त्यातच बदाम, खारीक, खसखस, व तीळ या सर्व पावडरी टाकून पुन्हा हे मिश्रण परतून घ्यावे. consistency साठी नंतर हे सर्व साहित्य फूड प्रोसेसर मधून फिरवून घ्यावे.
- दुसऱ्या पातेल्यात अर्धा वाटी तुपामध्ये मुगाचे पीठ छान भाजून घ्यावे. हे मिश्रण सैलसर झाल्यावर आणि पिठाचा उग्र दर्प गेल्यावर त्यामध्ये खजुराची पेस्ट टाकून पुन्हा परतून घ्यावे.
- ही दोन्ही मिश्रणे एकत्र करावीत त्यांच्यामध्ये पिठीसाखर टाकावी, आणि लगेच हाताला थोडेसे तूप लावून, या मिश्रणाचे (जमतील तसे) लाडू वळावेत.
जेव्हा तुम्च्या सुपुत्राने दोन लड्डू पळविलेच आहेत तर, निधर्मी असलात तरी, "प्राप्तेषु अष्टमे वर्षे" सुसुत्र बंधनात बसवायला विसरू नका...
ReplyDelete