आताच कॅमेऱ्यामधील सगळे फोटो कॉम्पुटरवर घेत होते. सर्व फोटो कॉपी झाल्यावर ते पुन्हा निवांतपणे चाळणे ओघाने आलेच. बघताना मध्येच एका फोटोपाशी थबकले. माझ्या आवडीच्या ट्रेमध्ये तीन बाउल भरून पास्ता रचलेला. कधी काढला होता बरे हा फोटो?.. हं, साधारण महिन्यापूर्वीचा दिसतोय - आणि मग down the memory lane जाता जाता शेवटी त्या रविवारच्या सुंदर दुपारपाशी येऊन थबकले.
रविवार असूनही दोन्ही बायका येऊन त्यांची कामे करून गेल्या होत्या. (हा भाग्ययोगच एकप्रकारे. कारण काही वेळा सुट्टीच्या दिवशी आम्ही तयार होऊन बसलो असतो बाहेर जाण्यासाठी व या पठ्ठया काही यायचे नाव घेत नाहीत.) आम्हीपण सर्व आवरून निवांतपणे सोफ्यावर आपापल्या आवडत्या जागी विराजमान झालो होतो. टीव्हीवर (कधी नव्हे तो) तिघांच्याही आवडीचा मनपसंत चित्रपट चालू होता. साधारण एकच्या सुमारच तिघानाही एकदमच भुकेची जाणीव झाली. व तिघानाही पास्त्याचे डोहाळे लागले. मग काय, त्यांचा सेनापती (अर्थात अस्मादिक) लागले तयारीला. घरात तशी सगळीच तयारी होती. देर थी तो बस्स सभी चीजोंको एकसाथ मिलानेकी !! उनपे थोडा प्यार छिडका, और तय्यार हो गया- मम्मी स्पेशल पास्ता !! (थोडेसे - नाही, बरेचसे- नाटकी वाटते का? कदाचित जाहिरातींचा परिणाम असेल.. By the way, माझा मुलगा अजून तरी आम्हा दोघांना स्वच्छ आई-बाबा असेच म्हणतो.. :) )
तर कुठे होते मी? हं, पास्ता !! चला तर, पाहूया साहित्य आणि कृती?
साहित्य:
sunfeast pasta treat चे एक पाकीट (double pack- मी कॉर्न-बेस असलेला घेतला होता.)
चिरलेल्या भाज्या - जसे की कोबी, कांदा, टोमाटो, बिन्स, गाजर, किंवा suitable आणि आवडणाऱ्या दुसऱ्या कोणत्याही (पथ्य एकच की त्या सर्व भाज्या बारीक चिरून घ्याव्यात.)
दोन चमचे बटर
दोन चमचे ओलिव्ह तेल
५-६ पाकळ्या लसूण बारीक चिरून
चवीपुरते मीठ
mixed hurbs
चीज वगैरे आवडीनुसार
कृती:

- प्रथम बटर मध्ये चिरलेला लसूण परतून घ्यावा व त्यातच चिरलेल्या भाज्याही परतून घ्याव्यात.
- भाज्या शिजत असतानाच एकीकडे पास्ता नेहेमीच्या पद्धतीने करून घ्यावा. (आपण दो-मिनिट नुडल्स करतो त्याच प्रकारे). पास्ता पाण्यात उकळत असतानाच त्यात दोन चमचे ओलिव्ह तेल घालावे.
- पास्ता नीट शिजला कि तो भाज्यांमध्ये मिक्स करावा.
- या मिश्रणात चवीपुरते मीठ (भाज्यांसाठीच, कारण पास्ता-मेकर मध्ये मीठ असते), व mixed-hurbs घालावेत.
No comments:
Post a Comment