Tuesday, April 21, 2015

फक्त एक श्वास…

नमस्कार,

गेले काही दिवस मी एक खूप सुंदर अनुभव घेत आहे - श्वासाच्या जाणीवेचा. जे लोक नित्यनेमाने मेडीटेशन करतात त्यांना हा रोजचाच अनुभव असेल. त्यामुळे हा लेख खास माझ्यासारख्याच "अचपळ मन माझे नावरे नावरिता' वाल्या मानसिकतेच्या लोकांसाठी आहे.

काय आनंद असतो म्हणून सांगू स्वतःचाच स्वतःशी चाललेला मुक्त संवाद अनुभवण्यात… जास्त काही लागत नाही आणि त्याला. घरातला कुठलाही शांत कोपरा आणि सकाळची शुचिर्भूत वेळ. आपण काहीच करायचे नाही. नुसते डोळे मिटून बसायचे. आणि जमेल तेवढा मनापासून दीर्घ श्वास घ्यायचा प्रयत्न करायचा. मग आणखीन एक… मग त्यापुढचा. इतकेच…

काय काय चालू असते हो आपल्या मनात ! - कुकरची शिट्टी बंद केली का?  - back to breathing - ह्या महिन्यासाठी finance जरा नीटच manage करावा लागणार आहे बहुतेक…. back to breathing - manager has sent a nice note of appreciation, waw ! .... back to breathing... मला खरंच वजन "क्ष" इतके करायचे आहे. काय मज्जा येईल. मग मी तो त्यादिवशी पाहिलेला ड्रेस घेईन…. and back to breathing... काल बाळ थोडं कमीच जेवलं का? थोडा बारीकच वाटतोय तो. … and back to breathing...

आले नं लक्षात मला काय म्हणायचे आहे ते? :)

पण महत्वाचे काय तर "back to breathing" मग कधीतरी ती लय सापडते. आपण नकळतपणे श्वासांचा rhythm enjoy करू लागतो. We start appreciating the moment.. the very present.. सगळे गुंते कसे अलवारपणे सुटल्यासारखे वाटतात. समोरचा मार्ग, आजचा दिवस डोळ्यासमोर स्वच्छ उभा राहतो. का कोण जाणे, पण मनात एक खोल समाधान शांती झिरपल्यासारखी वाटते. मी तर निसर्गाचे आभार मानते त्यावेळी- आजचा नवानितळ दिवस मला अनुभवायला दिल्याबद्दल ….

 

Monday, April 20, 2015

August Rush

नमस्कार,

गेल्या आठवडयात आम्हा तिघांनाही बराचसा मोकळा वेळ होता. पण तरीही आजकाल पंचाईत अशी होते की खूप आशेने टीव्ही लावावा तर काहीही चांगले पाहायला मिळत नाही. सर्व प्रकारच्या मराठी  मालिका आमच्या "to watch" लिस्ट मधून कधीच बाद झाल्या आहेत. हिंदी चित्रपटही अगदी चुकून बघितला जातो. आणि इंग्लिश चित्रपटांचेही तसेच. परवा मात्र अगदी अपघातानेच एक चांगला चित्रपट बघायला मिळाला. चित्रपटाचे नाव ऑगस्ट रश.

टेक १: एक तरुण आणि तरुणी भेटतात. दोघांची कॉमन आवड संगीत. त्यांना निसर्गातील प्रत्येक गोष्टीत एक नाद, लय जाणवत असते. तर असे हे वेडे जीव भेटतात आणि एका रात्रीनंतर त्यांची ताटातूट होते. ती गर्भवती राहते पण तिचे मूल जन्मतःच दगावले अशी तिची समजूत करण्यात येते.

टेक २: एक दहा अकरा वर्षाचा अतिशय भावूक निळ्या डोळ्यांचा मुलगा विनवणी करतोय. रिमांड होम मधील एका अधिकाऱ्याची. त्याला कुठेही जायचे नाहीये. त्याला विश्वास आहे की त्याचे आई-वडील आहेत, आणि ते कधीतरी त्याला भेटतील. परिस्थितीपुढे कोणाचाच काही इलाज नाही हे जाणवल्यावर तो मुलगा चक्क पळून जातो. जगात वेगवेगळे अनुभव घेत जातो. तहानभूक हरवणारी अशी एकच गोष्ट सोबतीला - संगीत. लोकांची गर्दी, भांड्याचे आवाज, भटक्या लोकांच्या आरोळ्या या सगळ्यातच त्याला एक नाद जाणवत असतो. मजल दरमजल करत तो चक्क एका प्रसिद्ध संगीत विद्यालयात दाखल केला जातो. तेथील शिक्षकही त्याच्या प्रतिभेने चकित होतात.

इकडे या तरुणीला आपल्या वडिलांकडून कळते की तिचा मुलगा जिवंत आहे. तिकडे तो तरुण आपल्या प्रेयसीला शोधत असतो. आपल्याला एक मुलगाही आहे हे त्याला ज्ञात नसते.

उरलेला चित्रपट म्हणजे या तीन जीवांच्या पुनर्भेटीचा उत्कट प्रवास आहे. सर्वात शेवटी जेंव्हा त्या तिघानाही जेंव्हा शब्दावाचून या नयनिचे त्या नयनी सर्व जाणवते तो क्षण आम्ही तिघांनी अक्षरशः हातात हात गुंफून अनुभवला… खरंच अप्रतिम !!

 
 






 

Wednesday, April 15, 2015

Before Sunrise, before sunset, and before midnight...

नमस्कार,

तुम्ही जर चांगल्या चित्रपटांचे भुकेलेले असाल तर तुम्ही वर उल्लेखलेली Triology नक्की पाहिलेली असेल. मला स्वतःला त्या मालिकेतला तिसरा चित्रपट अजून बघायचाय. पण पाहिलेले पहिले दोन निव्वळ अप्रतिम आहेत.

पहिल्या भागात आपल्या कथेचे नायक आणि नायिका अपघाताने एकत्र येतात, युरोप मधील ट्रेन प्रवासात. बोलता बोलता एकमेकांसमोर उलगडत जातात. मग ठरवून ट्रेनमधून खाली उतरतात आणि व्हिएन्नाच्या नितांतसुंदर गल्ल्यांमधून भटकत वेळ घालवतात. खरे तर तिला जायचं Paris ला आणि त्याला US ला. पण हाती असलेले क्षण ते कसे जगतात हे अनुभवण्याचीच गोष्ट आहे. प्रेमाचा आविष्कार तर आहेच, पण त्या ही पलीकडे जाऊन त्यांचे संवाद इतके सहजसुंदर आहेत की असे वाटते की एक कॅमेरा रोल होतोय आणि दोन माणसे त्याचे भानच नसल्यासारखी हितगुज करत आहेत. या मनीचे त्या मनी… दोघेही एकमेकांना एका ठरलेल्या ठिकाणी सहा महिन्यांनी भेटतील या आश्वासनावर पहिला भाग संपतो. दोघं वेगळे होतात -पत्ते, नंबर वगैरे काहीही नं जाणून घेता…

दुसरा भाग सुरु होतो तो एका बुक स्टोर मध्ये. तो प्रसिद्ध लेखक आहे. आपल्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या कादंबरीचे अभिवचन करत तो युरोपभर हिंडत आहे. एक दिवस तो Paris मध्ये येतो. आणि एका बुक स्टोर मध्ये चर्चा करत असताना त्याला ती भेटते… दोघांमधील अधुरा संवाद पुन्हा सुरु होतो. आणि मधला नऊ वर्षाचा काळ अतिशय तलम हळुवारपणे उलगडत जातो.

अनेक समीक्षकांनी या दोन्ही - खरंतर तिन्ही - चित्रपटाना " one of the best romantic films ever" म्हणून गौरवलेले आहे. अर्थात म्हणून त्यांना निव्वळ romantic movies असे लेबल नाही लावता येणार. माझ्या मते त्या दोघांमधील संवाद हाच चित्रपटाचा आत्मा आहे.

एक सहज अनुभव म्हणून नक्की बघा हे चित्रपट. तुम्हाला आवडतील अशी खात्री आहे माझी.

 
 





 

Tuesday, April 14, 2015

Labor in Freedom..

नमस्कार,

गेले काही दिवस माझे नवरोजी Albert Einstein चे एक वाक्य मध्येमध्ये quote करत आहेत.

Everything that is really great and inspiring is created by the individual who can labor in freedom.

किती सुंदर विचार आहे नं. म्हणजे स्वातंत्र्य मिळाले. मनासारखे जगण्याचे, हवे ते करण्याचे. पण पुढे काय? हाच खरा महत्वाचा प्रश्न आहे.

गेल्या आठवड्यात आम्ही दोघे या विधानावर चर्चा करत होतो. त्यावेळी याने मला अतिशय सोप्या शब्दात वरील वाक्याचा अर्थ समजावला.

बघा हं - आपल्यापैकी प्रत्येक जण अनेक प्रकारे विचार करत असतो. काहीतरी मिळवू पाहत असतो. आपल्याला रोज असंख्य कल्पना सुचत असतात आयुष्य अधिकाधिक समृध्द करण्याच्या. निसर्गाने प्रत्येकाला पुरेशी विचारशक्ती दिली आहे. तरीही मग विचारवंत आणि सामान्य माणसे यांच्यात नक्की फरक काय बर असतो? तर लेबर. कष्ट. स्वातंत्र्यामधील कष्ट.

आपल्यापैकी बऱ्याच जणांचे होते काय की "आपल्याला एक कल्पना सुचली आहे" या गोष्टीच्याच ते प्रेमात पडतात. पण ती कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी जे कष्ट, जिद्द, चिकाटी आवश्यक असतात त्याचा मात्र आपल्याकडे अभाव असतो. जसे की  एखाद्या चित्रकाराला अतिशय निसर्गरम्य चित्राची कल्पना सुचणे हा एक भाग, पण त्या विचाराने झपाटून जाऊन त्याने ब्रश, रंग, कॅनवास हातात घेऊन ते चित्र प्रत्यक्षात उतरवणे हा दुसरा भाग. अशा कष्टकरी जीवासाठी यश हे आहेच आहे.



 

Sunday, April 12, 2015

एक छोटेसे पाऊल.. आयुष्य घडविण्यासाठी

नमस्कार,

तुम्ही Leo Babauta हे नाव ऐकले आहे का? माणूस ठरवले तर किती स्वतःमध्ये किती बदल घडवू शकतो याचे हा अवलिया एक उत्तम उदाहरण आहे. त्याच्या अतिशय सुंदर ब्लॉगची लिंक खाली देत आहे.

http://zenhabits.net/

लिओ अगदी जगावेगळे सांगतो असे नाही, पण त्याची शैली विलक्षण आहे हे नक्की. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यातल्या बऱ्याच समस्यांशी आपण अगदी सहजपणे रिलेट होतो. आणि म्हणून लिओ त्या समस्यांवर काय काय साधे सोपे मार्ग सुचवतोय ह्याचा मागोवा आपण नकळतपणे घेत राहतो.

एक पस्तिशीचा मनुष्य. chain smoker, overweight,  पदरी सहा मुले. आर्थिक परिस्थिती इतकी हलाखीची की काही वेळा मुलांच्याच piggy bank मधून थोडेसे पैसे घेऊन  जेवणाची सोय करायची. आयुष्य बदलायचे इतक्या प्रकारे प्रयत्न करून झाले तरीही अपयश हे ठरलेलेच.

एके दिवशी "हे सर्व बदललेच पाहिजे - यश मिळालेच पाहिजे " ह्या ध्यासाने अंतरंगात  तटस्थपणे डोकावून पाहिले असता अचानक लक्षात आले की  - "अरे, आपण खूप सारे प्रयत्न अनेक दिशांनी करत आहोत, पण त्यामध्ये फोकस चा अभाव आहे. स्वतःमधल्या बदलाची सुरुवात ही फक्त एका छोट्या गोष्टीपासून सुरु करायला हवी. ती सवय अंगी बाणली की मगच दुसऱ्या मुद्याकडे वळायचे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे  पडणारे  प्रत्येक पाऊल मनापासून जगायचे. "

मग काय, एका शांत आणि निश्चिंत प्रवासाला सुरुवात झाली. पहिला संकल्प होता धूम्रपान सोडायचा. एकच संकल्प पहिल्या वर्षी, पण सगळे प्रयत्न त्या दिशेने एकवटलेले. वर्षभराने लक्षात आले की आपण १०० टक्के यशस्वी झालो आहोत. मग दुसरा संकल्प.. या माणसाने काय काय achieve केले आहे ते त्याच्या ब्लॉगवर वाचायला मिळेलच तुम्हाला. पण नक्की वाचा कधीतरी.. त्याचे सगळे लेख सावकाशीने वाचा. ठरवले, आणि फक्त एकच निश्चयाने भरलेले पाऊल पुढे टाकले तर आयुष्याला मनासारखा आकार येत जातो यावर नक्की विश्वास बसेल तुमचा.

 

Saturday, April 11, 2015

आठवणींचा डीप फ्रीझर ..

नमस्कार,

थोडे चक्रमच वाटतेय का शीर्षक? आहे खरे. पण त्याहूनही मजेची गोष्ट ही आहे की आपल्या सगळ्यांच्याच घरात आजकाल ही वस्तू येऊ घातली आहे. काही घरांमध्ये तर दुर्दैवाने ती आयुष्याचा अगदी अविभाज्य भाग बनली आहे. म्हणून विचार केला की  व्यक्त होऊयाच जरा ..

आज चिरंजीवांच्या शाळेत एक कार्यक्रम होता - Graduation Day. गैरसमज नको. आमचे बाळ आता कुठे पहिलीत गेले आहे. पण आजकाल upper KG साठीही पदवीदान समारंभ होतो. :) तर हा कार्यक्रम जवळपास दोन तास चालला होता. ४/५ वर्षांची बछडी अगदी धिटुकलेपणाने काहीबाही सदर करत होती. आणि मुलांचे आईवडील दुप्पट उत्साहाने या प्रसंगाचे चित्रीकरण करत होते. आणि आपल्या पाल्याचा कार्यक्रम झाला की  पुन्हा मोबाईलमध्ये रममाण होत होते.

मला अशा प्रकारांची एकूणच मजा वाटते आजकाल. म्हणजे फोटो काढणे या प्रकाराला विरोध नाही हं माझा. काही महत्वपूर्ण क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करून अजरामर करणे ही नक्कीच आनंददायी गोष्ट आहे. पण शिंका आल्यासारखे, अगदी आततायीपणाने आणि "फोटो काढणे is a norm, and hence must" अशा अविर्भावात फोटो काढणे हे कितपत समाधान देणारे असेल याविषयी मला अगदी प्रामाणिक शंका आहे. आणि आताचा क्षण ओरबाडल्यासारखा मुठीत पकडून शिळा करायचा, आठवणींच्या डीप फ्रीझर मध्ये ठेवायचा- जवळपास कधीही न बाहेर काढण्यासाठी - या प्रकारात त्या गोष्टीची सगळी मजाच आपण घालवून टाकतो असे नाही वाटत तुम्हाला?

कशाच्या मागे धावतोय नक्की आपण.. why are we forgetting to eat fresh from the farm, and constantly re-heating the things which have lost their aatma?...

तुम्ही Antoine De Saint चे "The Little Prince" पुस्तक वाचलेय का? त्यामध्ये  तो प्रिन्स एके ठिकाणी म्हणतो - If I had fifty-three minutes time to spend as I liked, I should walk at my leisure toward a spring of fresh water."

आताचा क्षण उद्या, परवा कधीतरी जगू म्हणून शिलकीत ठेऊन द्यायचा, आणि उद्या, परवाही तेच करायचे… शेवटी उरते ते सत्वहीन, भकास रिकामेपण. खूप खूप negative वाटतेय का? असेल कदाचित. पण थोडा विचार करायला काय हरकत आहे.

डीप फ्रीझर ही सोय नक्कीच आहे पण काही वेळा तरी ताजे गरमागरम अन्न घेऊया. आला क्षण पूर्णपणे अनुभवत जगूया. काय म्हणताय ?

 

Thursday, April 9, 2015

Dale Chihuly: इस शीशे पे दिल आ गया…

नमस्कार,

बरोबर दीड वर्षाने पुन्हा एकदा ब्लॉगकडे फिरकले आहे. :) आता थोडा नियमितपणा आणिन म्हणतेय लिखाणात. बघू या कसे जमते ते.

तर, निमित्त झाले एका नवीन YouTube video चे.

थोडा वेळ होता लंच ब्रेक मध्ये तर online लोकप्रभा अंक चाळत बसले होते. त्यात श्री. अमित सामंत यांचा एक लेख वाचनात आला. लेखाचे नाव होते - काचेचे गाव. त्यात त्यांनी न्यूयॉर्क मधील एका काचेच्या museum चा उल्लेख केला होता. त्यात असलेले fern green tower चे १५ फुटी काचशिल्प पाहून उत्सुकता चाळवली. वाचताना कळले की हे Dale Chihuly या जगद्विख्यात कलाकाराचे शिल्प आहे. मग काय, लगेच YouTube शोधले. खाली दिलेली लिंक जरूर बघा. काचेच्या तुकड्यांमध्ये हा अवलिया असे काही भ्रम करतोय की  ज्याचे नाव ते. निव्वळ अप्रतिम.

https://www.youtube.com/watch?v=OndIFim3w0I

खाली वानगीदाखल त्याच्या काही कलाकृती टाकत आहे- इंटरनेट वरून मिळालेल्या अर्थात !



आणि हा त्यांचा जनक -  Dale Chihuly !!




 

गोंधळलेले बटाटे 😀

 साधारण ९ वर्षांनी फिरकले आहे स्वतःच्या ब्लॉग वर. म्हणजे बाकी प्रोफेशनल प्लॅटफॉर्म्स वर लिखाण चालू होते पण मातृभाषेतल्या लिखाणाची मजा वेगळीच...