नमस्कार,
गेले काही दिवस माझे नवरोजी Albert Einstein चे एक वाक्य मध्येमध्ये quote करत आहेत.
Everything that is really great and inspiring is created by the individual who can labor in freedom.
किती सुंदर विचार आहे नं. म्हणजे स्वातंत्र्य मिळाले. मनासारखे जगण्याचे, हवे ते करण्याचे. पण पुढे काय? हाच खरा महत्वाचा प्रश्न आहे.
गेल्या आठवड्यात आम्ही दोघे या विधानावर चर्चा करत होतो. त्यावेळी याने मला अतिशय सोप्या शब्दात वरील वाक्याचा अर्थ समजावला.
बघा हं - आपल्यापैकी प्रत्येक जण अनेक प्रकारे विचार करत असतो. काहीतरी मिळवू पाहत असतो. आपल्याला रोज असंख्य कल्पना सुचत असतात आयुष्य अधिकाधिक समृध्द करण्याच्या. निसर्गाने प्रत्येकाला पुरेशी विचारशक्ती दिली आहे. तरीही मग विचारवंत आणि सामान्य माणसे यांच्यात नक्की फरक काय बर असतो? तर लेबर. कष्ट. स्वातंत्र्यामधील कष्ट.
आपल्यापैकी बऱ्याच जणांचे होते काय की "आपल्याला एक कल्पना सुचली आहे" या गोष्टीच्याच ते प्रेमात पडतात. पण ती कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी जे कष्ट, जिद्द, चिकाटी आवश्यक असतात त्याचा मात्र आपल्याकडे अभाव असतो. जसे की एखाद्या चित्रकाराला अतिशय निसर्गरम्य चित्राची कल्पना सुचणे हा एक भाग, पण त्या विचाराने झपाटून जाऊन त्याने ब्रश, रंग, कॅनवास हातात घेऊन ते चित्र प्रत्यक्षात उतरवणे हा दुसरा भाग. अशा कष्टकरी जीवासाठी यश हे आहेच आहे.

No comments:
Post a Comment