नमस्कार,
तुम्ही Leo Babauta हे नाव ऐकले आहे का? माणूस ठरवले तर किती स्वतःमध्ये किती बदल घडवू शकतो याचे हा अवलिया एक उत्तम उदाहरण आहे. त्याच्या अतिशय सुंदर ब्लॉगची लिंक खाली देत आहे.
http://zenhabits.net/
लिओ अगदी जगावेगळे सांगतो असे नाही, पण त्याची शैली विलक्षण आहे हे नक्की. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यातल्या बऱ्याच समस्यांशी आपण अगदी सहजपणे रिलेट होतो. आणि म्हणून लिओ त्या समस्यांवर काय काय साधे सोपे मार्ग सुचवतोय ह्याचा मागोवा आपण नकळतपणे घेत राहतो.
एक पस्तिशीचा मनुष्य. chain smoker, overweight, पदरी सहा मुले. आर्थिक परिस्थिती इतकी हलाखीची की काही वेळा मुलांच्याच piggy bank मधून थोडेसे पैसे घेऊन जेवणाची सोय करायची. आयुष्य बदलायचे इतक्या प्रकारे प्रयत्न करून झाले तरीही अपयश हे ठरलेलेच.
एके दिवशी "हे सर्व बदललेच पाहिजे - यश मिळालेच पाहिजे " ह्या ध्यासाने अंतरंगात तटस्थपणे डोकावून पाहिले असता अचानक लक्षात आले की - "अरे, आपण खूप सारे प्रयत्न अनेक दिशांनी करत आहोत, पण त्यामध्ये फोकस चा अभाव आहे. स्वतःमधल्या बदलाची सुरुवात ही फक्त एका छोट्या गोष्टीपासून सुरु करायला हवी. ती सवय अंगी बाणली की मगच दुसऱ्या मुद्याकडे वळायचे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पडणारे प्रत्येक पाऊल मनापासून जगायचे. "
मग काय, एका शांत आणि निश्चिंत प्रवासाला सुरुवात झाली. पहिला संकल्प होता धूम्रपान सोडायचा. एकच संकल्प पहिल्या वर्षी, पण सगळे प्रयत्न त्या दिशेने एकवटलेले. वर्षभराने लक्षात आले की आपण १०० टक्के यशस्वी झालो आहोत. मग दुसरा संकल्प.. या माणसाने काय काय achieve केले आहे ते त्याच्या ब्लॉगवर वाचायला मिळेलच तुम्हाला. पण नक्की वाचा कधीतरी.. त्याचे सगळे लेख सावकाशीने वाचा. ठरवले, आणि फक्त एकच निश्चयाने भरलेले पाऊल पुढे टाकले तर आयुष्याला मनासारखा आकार येत जातो यावर नक्की विश्वास बसेल तुमचा.

No comments:
Post a Comment