Wednesday, April 22, 2015

The joy of building things...

नमस्कार,

काल दिवसभरात दोन-तीन गोष्टी अशा घडल्या की  त्यांच्यामध्ये मला कमालीचे साधर्म्य आढळले. मग खोलात जाऊन तपास केला असता जाणवले की या सर्वांमध्ये काहीतरी बनविण्यातला आनंद हे समान सूत्र आहे.

काल सकाळी नेहेमीप्रमाणेच "आता वजन घटवायाचेच" या निश्चयाने व्यायामाच्या सायकलवर पेडल मारत होते. माझा अनुभव असा आहे की जर त्यावेळी टीव्हीवर काहीतरी चांगले सुरु असेल तर तो वेळ पटकन जातो आणि लक्ष सारखे कॅलरीमीटर कडे जात नाही :) . तर काल Julia Roberts आणि Richard Gere चा सदाबहार Pretty Woman लागला होता आणि तो सुद्धा HD वर. हा चित्रपट चालू असेल तर एका वेळी ५०० कॅलरीज जाळायला पण माझी काही हरकत नसते. :) तर या चित्रपटात एक प्रसंग आहे, ज्यामध्ये जुलिया रिचर्डला विचारत असते की तुझा पोटापाण्याचा उद्योग काय. त्यावर तो तिला सांगतो - "I buy/cell companies which are in financial difficulties." आणि मग तो तिला त्यातील dynamics समजावत असतो. ते सर्व ऐकून ती त्याला पुन्हा विचारते- "You don't make things, you don't build things, so what do you do Edward?". हा प्रश्न ऐकून तो अंतर्मुख होतो. आणि त्याच्याबरोबर मी पण …

माझी घाई सुरु आहे ऑफिसला निघण्याची. त्याचवेळी बाळाला (६ वर्षाच्या मुलाला) डे केअर मध्ये सोडायचे आहे. त्याला १०० हाका मारून झालेल्या आहेत तरीही ते "आई आलोच गं" असेच उत्तर आतल्या खोलीतून देतोय. माझे कुतूहल चाळवते आणि मी आत जाऊन बघते. चिरंजीव लेगोच्या तुकड्यांमधून एक अतिशय complicated आकार बनविण्याचा प्रयत्न करत आहेत. मी दाराबाहेर उभी आहे याचीही त्याला जाणीव नाहीये. अंगावर कोणता ड्रेस आहे, किती वाजले आहेत, भूक लागलेय बहुतेक असे कुठलेही विचार त्याच्या मनात नसावेत नक्कीच इतका तो तल्लीन झाला आहे. कुठलीही self-help/motivational/philosophical पुस्तके न वाचताही स्वारी त्या क्षणांचा पुरेपूर आनंद लुटत आहे. आणि त्या तल्लिनतेकडे बघत मी भारावल्यासारखी दारात उभी आहे …

संध्याकाळची वेळ. तिघेही घरी जमलो आहोत आणि नेहेमीप्रमाणे सोसायटीमध्ये राउंड मारायला बाहेर पडत आहोत. तितक्यातच नवरा अचानकपणे म्हणतो की  आज आपण प्रश्नोत्तरांचा गेम खेळूया. म्हणजे तो प्रश्न विचारणार आणि मी उत्तर द्यायचे असे. (यामागे कदाचित माझी नेहमीचीच बोरिंग बडबड टाळावी असाही उद्देश असेल कदाचित. असो.) पण त्या गेममध्ये मी ही रमते. आणि तो एकदम विचारतो "what are the things which you have learned/tried to learn after your formal school, college and university education is over? When was the last time you lost yourself trying to create things? " I am speechless again, for the third time in a day.

आता मात्र ठरवले आहे- काहीतरी बनवायचेच. paper quilling ने सुरुवात करूया म्हणतेय …. मला माझे हरवलेपण अनुभावायचेय …



 

No comments:

Post a Comment

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...